महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026: अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर

Published On: February 10, 2026
Follow Us
Maharashtra Budget 2026 date

महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget 2026) लवकरच सुरू होत आहे. हे अधिवेशन राज्याच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे व्यासपीठ असते, ज्यात अर्थसंकल्प मांडला जातो आणि विविध सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर चर्चा होते. यंदाच्या अधिवेशनाची तारीख आणि कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, तो मुंबईत विधानभवनात होणार आहे. चला, या अधिवेशनाबद्दल (Maharashtra Budget 2026 Date) सविस्तर जाणून घेऊया.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्थसंकल्प सादरीकरण

सर्वांचे लक्ष लागून असलेली Maharashtra Budget 2026 Date आता निश्चित झाली आहे. बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाची दिशा आणि विविध योजनांसाठी होणारी तरतूद स्पष्ट होईल, त्यामुळे या दिवसाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ महाराष्ट्र सोमवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यंत चालेल. हा एकूण २९ दिवसांचा कालावधी असून, यात राज्याच्या आर्थिक योजनांचा आढावा घेतला जाईल.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 मोठे निर्णय येथे वाचा

अधिवेशनाचे वेळापत्रक आणि सुट्ट्या

या अधिवेशनाच्या कालावधीत कामकाजाचे दिवस आणि सुट्ट्यांचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

  • सुरुवात: सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६.
  • शनिवारचे कामकाज: विशेष म्हणजे, अधिवेशनादरम्यान शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी असली तरी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे.
  • सुट्ट्या: २ मार्च (सोमवार): होळी
  • ३ मार्च (मंगळवार): धूलिवंदन
  • १९ मार्च (गुरुवार): गुढीपाडवा
  • २० मार्च (शुक्रवार): या दिवशीही विधिमंडळाचे कामकाज होणार नाही.

दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली

या अधिवेशनाची सुरुवात एका भावूक वातावरणात होणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री, दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात त्यांच्या सन्मानार्थ शोक प्रस्ताव मांडला जाईल.

पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक 21,413 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, संपूर्ण माहिती

महिला आणि शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चा

संयुक्त राष्ट्र संघाने (UN) सन २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. याचे औचित्य साधून अधिवेशनात या विषयावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित केले जाईल.

याशिवाय, ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त देखील सभागृहात विशेष चर्चा होईल आणि निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभही याच अधिवेशनात पार पडेल.

राज्याच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने Maharashtra Budget 2026 27 हे अत्यंत कळीचे ठरणार आहे. ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या या (Maharashtra Budget 2026) कडे शेतकरी, नोकरदार, महिला आणि उद्योजक अशा सर्वच वर्गांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 मध्ये सामान्यांसाठी काय दडलंय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ठळक वैशिष्ट्ये

  • संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा करण्यात येणार आहे.
  • जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.
  • मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार आहे
  • निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment