MH-DPN PHN CET 2025 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सूचना जाहीर

Published On: April 25, 2025
Follow Us
MH-DPN PHN CET 2025

MH-DPN PHN CET 2025 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्याने MH-DPN/PHN CET 2025 बाबत सूचना क्र. 03 द्वारे एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या सूचनेनुसार परीक्षा ८ एप्रिल २०२५ रोजी मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे एकाच सत्रात पार पडली होती.

MH-DPN PHN CET 2025 पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक

  • प्रश्नपत्रिका व मॉडेल उत्तरतालिका ऑनलाईन प्रसिद्धी
    24 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025
  • प्रश्नपत्रिका/उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्याची मुदत (प्रति हरकत ₹1000 शुल्कासह)
    24 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल 2025

हरकती नोंदवण्याची प्रक्रिया

  • उमेदवार फक्त कॅंडिडेट लॉगिनद्वारे हरकती नोंदवू शकतात.
  • एका प्रश्नासाठी हरकत नोंदवताना ₹1000/- शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
  • फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या हरकतींचाच विचार केला जाईल.
  • ई-मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

लक्षात ठेवा

जर तुम्हाला प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिकेतील कोणत्याही प्रश्नाविषयी शंका असेल, तर दिलेल्या वेळेत हरकत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमच्या उत्तरपत्रिकेचे फेरपरीक्षण होण्याची शक्यता निर्माण होते.

  • अधिकृत स्रोत: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य
  • सूचना क्रमांक 03 | दिनांक: 21 एप्रिल 2025

अधिक माहितीसाठी: https://cetcell.mahacet.org/

MH-DPN PHN CET 2025

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment