MHT CET 2025 PCB Group Result महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) MHT-CET 2025 (PCB ग्रुप) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेत, महाराष्ट्रातील 172 आणि राज्याबाहेरील 9 केंद्रांवरून एकूण 2,82,734 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, ज्यात 93.91% उपस्थिती नोंदवली गेली.
MHT CET 2025 PCB Group Result
यावर्षी PCB ग्रुपमधून एकूण 14 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.
100 पर्सेंटाइल मिळवणारे विद्यार्थी (PCB ग्रुप):
- हरी श्रीनिवास अंबारकर (HARI SHRINIVAS AMBARKAR)
- श्रेया प्रसाद यादव (SHREYA PRASAD YADAV)
- अंशिका भावेश शाह (ANSHIKA BHAVESH SHAH)
- अथर्व शिरीष हवाल (ATHARV SHIRISH HAWAL)
- बाधे सिद्धी मनजबपू (BADHE SIDDHI MANJABAPU)
- विनीत विजयकुमार बोटुले (VINIT VIJAYKUMAR BOTULE)
- ओम अरुण आहेर (OM ARUN AHER)
- वैष्णवी सिद्धेश्वर लेंगारे (VAISHNAVI SIDDHESHWAR LENGARE)
- अपूर्वा प्रशांत कापडे (APURVA PRASHANT KAPADE)
- खंडेराज बळीराम वारकड (KHANDERAJ BALIRAM WARKAD)
- भक्ती मनीष मेन (BHAKTI MANISH MEN)
- कुरुडे आदिनाथ माधवराव (KURUDE AADINATH MADHAVRAO)
- यादव आर्या गिरीश (YADAV ARYA GIRISH)
- त्रिशा रत्नेश सावंत (TRISHA RATNESH SAWANT)
श्रेणीनुसार अव्वल विद्यार्थी:
- जनरल (खुला प्रवर्ग): अंशिका भावेश शाह (मुंबई शहर), यादव आर्या गिरीश (मुंबई उपनगर), त्रिशा रत्नेश सावंत (मुंबई उपनगर), श्रेया प्रसाद यादव (पुणे), अपूर्वा प्रशांत कापडे (ठाणे) या विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल मिळवले आहेत.
- ओबीसी: अथर्व शिरीष हवाल (कोल्हापूर), कुरुडे आदिनाथ माधवराव (नांदेड), ओम अरुण आहेर (नाशिक), बाधे सिद्धी मनजबपू (पुणे), आणि हरी श्रीनिवास अंबारकर (सोलापूर) यांनी 100 पर्सेंटाइल मिळवले.
- एसबीसी: भक्ती मनीष मेन (अकोला) हिने 100 पर्सेंटाइल मिळवले.
- NT 1 (NT-B): विनीत विजयकुमार बोटुले (नांदेड) याने 100 पर्सेंटाइल मिळवले.
- NT 2 (NT-C): वैष्णवी सिद्धेश्वर लेंगारे (लातूर) आणि खंडेराज बळीराम वारकड (नांदेड) यांनी 100 पर्सेंटाइल मिळवले.
इतर श्रेणींमध्येही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे:
- SC: रुचिका राजभोज (नाशिक) ने 99.9725739 पर्सेंटाइल मिळवले.
- ST: स्नेहल निवृत्ती दिवटे (पुणे) ने 99.9732047 पर्सेंटाइल मिळवले.
- SEBC (मराठा): विश्वजीत विष्णू जाधव (परभणी) ने 99.9908324 पर्सेंटाइल मिळवले.
- DT/VJ: तुषार ताराचंद चव्हाण (लातूर) ने 99.9151483 पर्सेंटाइल मिळवले.
- NT 3 (NT-D): तुषार अशोक वारहाडे (छत्रपती संभाजीनगर) ने 99.9953577 पर्सेंटाइल मिळवले.
- लागू नाही (Not Applicable): रिद्धी सिन्हा (नवी दिल्ली) ने 99.9953770 पर्सेंटाइल मिळवले.
या निकालामुळे आता पुढील प्रवेश प्रक्रियेला गती येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
संपूर्ण निकाल पीडीएफ येथे डाउनलोड करा


