MSRTC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस, अ‍ॅडव्हान्स आणि वेतन फरकाची रक्कम मंजूर, शासन निर्णय जारी

By MarathiAlert Team

Published on:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ‘गोड’ ठरणार आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी Diwali Gift म्हणून ६,००० रुपयांचे अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांसाठी १२,५०० रुपयांचा Festival Advance आणि २०२०-२४ मधील वेतनवाढीचा फरक (Arrears) दरमहा पगारासोबत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही घोषणा केली. या निर्णयामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काय आहे ‘ट्रिपल’ बेनिफिट? | MSRTC Diwali Bonus

दिवाळी भेट (Diwali Gift): सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ६,००० रुपयांचे सानुग्रह अनुदान (Ex-gratia Grant) दिले जाईल. यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता दिली आहे.

सण अग्रीम (Festival Advance): अग्रीम (Advance) घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच १२,५०० रुपये सण अग्रीम देण्यात येईल.

वेतन फरक (Arrears): सन २०२०-२०२४ दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम आता कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनासोबत दिली जाणार आहे. यासाठी शासनाने दरमहा ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

याबाबतचा अधिकृत Government Resolution (GR) गृह विभागाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट‘साठी रु. ५०.९२ कोटी आणि ‘सण अग्रीमा’साठी रु. ५६.२५ कोटी, असे एकूण रु. १०७.१७ कोटी रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या पाठीशी जसे सरकार उभे आहे, तसेच एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड झाली पाहिजे. त्याचबरोबर MSRTC ला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे.

MSRTC च्या आर्थिक बळकटीकरणावर भर:

MSRTC चे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महामंडळाच्या मालकीची जागा Public-Private Partnership (PPP) तत्त्वावर विकसित करून महसूल वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, शासनाने सुमारे ५१ कोटी रुपयांचे अनुदान MSRTC ला देण्यास सहमती दर्शविली आहे.

या निर्णयामुळे सुमारे ८५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना Financial Relief मिळाला असून, त्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!