Nashik Contract Workers Wages Inquiry नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची आता सखोल चौकशी होणार आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
या गैरव्यवहारावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जर कामगारांच्या बँक खात्यात जमा झालेली वेतनाची रक्कम दुसऱ्या कोणी काढली असेल, तर तो एक गंभीर फौजदारी गुन्हा मानला जाईल आणि संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि त्यांचे वेतन सुरक्षितपणे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल याची खात्री करण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही समिती यापुढे असे गैरप्रकार टाळण्यासाठी उपाययोजना सुचवेल.
कंत्राटी निदेशक कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 5 वर्षांवरील निदेशकांना नियमित करण्याचे निर्देश