महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) अर्थात बहुप्रतिक्षित PUP PSS MSCE Scholarship Exam Date For Class 5 and Class 8 परीक्षा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
PUP PSS MSCE Scholarship परीक्षेचे स्वरूप आणि विषय
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असे चार विषय असतील. ही परीक्षा एकूण ३०० गुणांची असणार आहे.
PUP PSS MSCE Scholarship Exam पात्रता आणि माध्यम
PUP PSS MSCE Scholarship या परीक्षेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच, तो शासनमान्य शाळांमध्ये (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित इत्यादी) इयत्ता पाचवी किंवा आठवीमध्ये शिकत असावा.
विशेष म्हणजे, ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये घेतली जाईल, ज्यामुळे भाषिक विविधता जपली जाईल.
वयाची अट (दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी):
- इयत्ता ५ वी: सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल ११ वर्षे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ वर्षे.
- इयत्ता ८ वी: सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल १४ वर्षे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षे.
PUP PSS MSCE Scholarship Exam ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू!
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
इच्छुक विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in आणि https://puppssmsce.in) २७ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज भरू शकतात. ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे:
- नियमित शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी: २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५.
- विलंब शुल्कासह अर्ज भरण्याचा कालावधी: १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५.
या कालावधीत शाळांना विद्यार्थ्यांचे माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे की, ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व शाळांनी आणि पालकांनी या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करून वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधींचे दार उघडणारी पहिली पायरी आहे. त्यामुळे, पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत अर्ज भरून PUP PSS MSCE Scholarship Exam च्या तयारीला लागावे.
शिष्यवृत्ती परीक्षा – 2026 बाबतच्या सूचना
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) सन २०२५-२६ च्या पूर्व तयारीबाबत – परिपत्रक डाउनलोड करा
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रूवारी – 2026 च्या अधिसूचना प्रसिध्दीबाबत
अधिकृत वेबसाईट : https://puppssmsce.in/
शिष्यवृत्ती परीक्षा अधिकृत वेबसाईट : https://2026.puppssmsce.in/




