महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) (PUPPSS) फेब्रुवारी २०२६ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेत वाढ केली आहे.
शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची नियमित शुल्कसह असलेली मुदत आता ८ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही वाढ विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ देणार आहे.
PUPPSS Scholarship 2026 Last Date सुधारित वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, इयत्ता ५वी आणि ८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याची मूळ मुदत २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ अशी होती. परंतु, शाळांच्या सोयीसाठी आणि विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवीन सुधारित वेळापत्रकानुसार, शाळा आता ८ डिसेंबर २०२५ पर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरू शकतात. ज्या शाळांनी अद्याप नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
परीक्षा: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
परीक्षेची तारीख: २२ फेब्रुवारी २०२६
अर्ज भरण्याची नियमित शुल्कासह अंतिम तारीख (PUPPSS Scholarship 2026 Last Date): ८ डिसेंबर २०२५
PUP PSS MSCE Scholarship Exam 2026 परीक्षेचे स्वरूप, पात्रता, ऑनलाईन अर्ज सविस्तर माहिती

विलंब शुल्क व अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. सर्व शाळांनी ३१ डिसेंबर २०२५ नंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची गंभीर नोंद घ्यावी.
याबाबत गांभीर्याने नोंद घ्यावी की, ३१ डिसेंबर २०२५ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही.
अधिसूचना: २७ ऑक्टोबर २०२५ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध.










