आरटीई 25 टक्के प्रवेश लॉटरी निकाल Admit Card डाउनलोड डायरेक्ट लिंक

Published On: April 6, 2026
Follow Us
RTE Admission Lottery Result Admit card

आरटीई (RTE) २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेची लॉटरी निकाल ६ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. आता पुढे नेमके काय करावे, निकाल कोठे चेक करावा? , SMS, allotment letter, पडताळणी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. प्रवेश निश्चित करण्यासाठी शासनाने ठरवलेल्या प्रक्रियेचे अचूक पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

या पार्श्वभूमीवर, लॉटरीनंतरची संपूर्ण प्रक्रिया सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित होऊ शकेल.

RTE प्रवेश 2026 लॉटरी निकाल जाहीर | RTE Admission Lottery Result Admit card

१. आपण भरलेला प्रवेशाचा अर्ज आणि पासवर्ड प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावा.

२. आपण प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे लॉटरी (सोडत) काढली जाईल आणि लॉटरीद्वारेच प्रवेश निश्चित केले जातील..

३. लॉटरी काढल्यावर आपण भरलेल्या प्रवेश अर्जातील मोबाईल नंबरवरच SMS प्राप्त होईल.

४. लॉटरी लागली अथवा नाही हे पाहण्यासाठी आरटीई च्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Application wise details या tab वर click करून Application number लिहावा आणि लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.

५. लॉटरी लागल्यावर RTE च्या वेबसाईट वर जाऊन अर्ज क्रमांक आणि प्रासवर्ड लिहून login करावे आणि admit card या tab वर click करून प्राप्त शाळेच्या नावाचे Allotment letter यी प्रिंट काढावी.

६ . Allotment letter ची प्रिंट घेऊन आपल्या विभागातील पडताळणी समितीकडे जावे पड़ताळणी समितीची यादी पत्ता वेबसाईटवर दिला जाईल पडताळणी समिती कडे जाताना प्रवेशासाठीची आवश्यक ती सर्व कागदपत्रे मूळ प्रमाणपत्रासह घेऊन जावीत.

७. पडताळणी समितीकडे जाऊ‌न कागदपत्रे तपासून Allotment letter च्या प्रिंटवर स्वाक्षरी आणि शिक्का घेऊन मगच विहित मुदतीत प्रपत शाळेत प्रवेशाकरिता जावे, पडताळणी समितीकडून तपासणी केल्याशिवाय शाळेत प्रवेश निश्चित होणार नाही याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment