पेन्शनधारकांच्या वारसांना मोठा दिलासा! हयातकालीन थकबाकी मिळवण्याचे नियम झाले सोपे; 5 वर्षांपर्यंत करता येणार अर्ज

Published On: April 8, 2026
Follow Us
Pensioner Arrears Payment Rules

Pensioner Arrears Payment Rules: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने ७ एप्रिल २०२६ रोजी निवृत्तीवेतनधारकांच्या वारसदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय निर्गमित केला आहे. निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या हयातकालीन थकबाकीचे (Arrears) प्रदान वारसदारांना सुलभतेने मिळावे, यासाठी कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली

निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकी मिळवण्यासाठी वारसदारांना पूर्वी १ वर्षाच्या आत अर्ज करावा लागत होता. आता ही अट शिथिल करून ती ५ वर्षे करण्यात आली आहे.

क्षतीपूर्ती बंधपत्राची गरज नाही

जर निवृत्तीवेतनधारकाने रितसर नामनिर्देशन (Nomination) केले असेल किंवा वारसदाराने वारसाहक्क प्रमाणपत्र सादर केले असेल, तर आता वारसदाराला ‘क्षतीपूर्ती बंधपत्र’ (Indemnity Bond) भरून देण्याची आवश्यकता राहणार नाही.

१ लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीसाठी सुलभ प्रक्रिया

जर निवृत्तीवेतनधारकाने नामनिर्देशन केले नसेल आणि थकबाकीची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर वारसांना न्यायालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. अशा प्रकरणी खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राच्या आधारे कोषागार कार्यालय स्तरावर रक्कम प्रदान केली जाईल:

  • तहसीलदारांकडून मिळालेले वारस प्रमाणपत्र.
  • सेवानिवृत्त झालेल्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले कुटुंब तपशील प्रमाणपत्र.
  • वारसदाराचे रक्कम मिळण्याबाबतचे स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र (सोबत बँक पासबुक, आधार, पॅन यांसारख्या कागदपत्रांच्या प्रती)

१ लाखापेक्षा जास्त रकमेसाठी नियम

जर थकबाकीची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा वारसदारांमध्ये काही वाद असतील, तर मात्र न्यायालयाकडून मिळालेल्या वारसाहक्क प्रमाणपत्राच्या (Succession Certificate) आधारेच रक्कम प्रदान केली जाईल.

PPO कॉपीची सक्ती नाही

रक्कम मिळवण्यासाठी वारसदाराकडे निवृत्तीवेतन प्रदान आदेशाचा भाग (Pensioner PPO Copy) उपलब्ध असल्यास तो घ्यावा, अन्यथा तसे लिखित स्वरूपात घेऊन रक्कम प्रदान केली जाईल.

शासनाच्या या निर्णयामुळे वारसाहक्क प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा कालापव्यय आणि आर्थिक बोजा कमी होणार असून, निवृत्तीवेतनधारकांच्या वारसांना मोठा प्रशासकीय दिलासा मिळाला आहे.

अधिक माहितीसाठी: निवृत्तीवेतनधारकांच्या वारसदारांसाठी शासन निर्णय डाउनलोड करा

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026
ERO AERO Annual Honorarium

मतदार नोंदणी अधिकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक मानधन देण्यास मंजूरी, शासन निर्णय जारी

August 7, 2026
nps-ups-pran-contribution-gr-2026

NPS-UPS कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! PRAN खात्यात अंशदान वेळेत जमा करण्यासाठी राज्य सरकारची नवी यंत्रणा

August 5, 2026
nhm-contract-employees-salary-pay-scale-gr-2026

NHM कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार कोणती वेतनश्रेणी लागू होणार? चेक करा

August 4, 2026
samagra shiksha contractual employees Regularization gr

राज्य सरकारचा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दूसरा मोठा निर्णय! समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याबाबत शासन निर्णय जारी

August 4, 2026

Leave a Comment