महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांमध्ये २५% जागा राखीव ठेवणारी RTE योजना ही शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची संधी आहे. RTE Admission Maharashtra 2026-27 अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो आणि त्यांची फी शासनाकडून भरली जाते.
अनेक पालकांना पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, लॉटरी पद्धत आणि प्रवेश निश्चिती याबाबत स्पष्ट माहिती नसते. त्यामुळे चुकीची माहिती किंवा अपूर्ण अर्जामुळे प्रवेशाची संधी गमावली जाऊ शकते.
या लेखामध्ये RTE 25% मोफत प्रवेश योजनेची संपूर्ण, अधिकृत आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे, ज्यामुळे पालकांना अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
RTE प्रवेशाचे रोजचे नवीन अपडेट्स आणि तारखा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Table of Contents
RTE 25% मोफत प्रवेश योजना नक्की काय आहे? | RTE Admission Maharashtra
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद राज्यामध्ये १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आली आहे. या अधिनियमातील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांसाठी स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळांमध्ये (स्वयंअर्थसहाय्यित) प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते.
RTE प्रवेशासाठी कोण पात्र आहे? | RTE Admission Eligibility Criteria
या योजनेचा लाभ प्रामुख्याने खालील दोन गटांतील विद्यार्थ्यांना मिळतो.
- आर्थिक दुर्बल घटक: ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा बालकांचा या गटामध्ये समावेश होतो.
- वंचित घटक: या गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एच.आय.व्ही. बाधित/प्रभावित बालके, अनाथ बालके आणि दिव्यांग बालकांचा समावेश होतो. तसेच १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या काळात कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
RTE प्रवेशासाठी पात्रता निकष काय आहेत याची सविस्तर माहिती RTE Admission Eligibility Criteria 2026 या लेखात दिली आहे.
आवश्यक वयोमर्यादा | RTE Admission Age Limit
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याबाबत शासनाने ३१ डिसेंबर हा मानीव दिनांक ठरवला आहे.
- प्ले ग्रुप / नर्सरी (इ. १ली पूर्वीच्या ३ रा वर्ग): किमान वय ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- इयत्ता १ ली: किमान वय ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच, शाळा प्रवेशासाठीच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता शासनाने दिलेली आहे.
RTE प्रवेशासाठी इयत्तेनुसार वयोमर्यादा किती आहे हे जाणून घेण्यासाठी RTE Admission Age Limit Maharashtra 2026 हा सविस्तर लेख वाचा.
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी | RTE Admission Documents List
RTE 25 टक्केप्रवेशासाठी खालील कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत.
निवासी पुरावा आणि जन्म प्रमाणपत्र: बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा सर्वांसाठी अनिवार्य आहे. निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, घरपट्टी, बँक पासबुक, आधार कार्ड, किंवा पासपोर्ट यांपैकी एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.
भाडेकरार: स्वतःच्या मालकीचे घर नसल्यास ११ महिन्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक आहे. हा भाडेकरार प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा असावा आणि त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी असणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड: विद्यार्थी आणि पालक यांचे आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड नसल्यास पावती जमा करून तात्पुरता प्रवेश मिळतो, मात्र ९० दिवसांच्या आत आधार कार्ड शाळेत जमा करणे सक्तीचे असते.
उत्पन्नाचा दाखला: आर्थिक दुर्बल घटकासाठी पालकांचा वार्षिक १ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा तहसिलदारांचा दाखला आवश्यक आहे. हा दाखला प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा.
जातीचा दाखला: वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी तहसीलदार किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे (परराज्यातील दाखला चालणार नाही).
इतर प्रमाणपत्रे: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र , कोविड प्रभावित बालकांसाठी पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र , आणि अनाथ/घटस्फोटित/विधवा महिलांच्या पाल्यांसाठी संबंधित न्यायालयीन किंवा अधिकृत कागदपत्रे लागतात.
RTE 25% प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची अधिकृत यादी पाहण्यासाठी RTE Admission Documents List 2026 PDF येथे तपासा.
RTE शाळांची यादी कशी तपासायची? | RTE Admission School List
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आपल्या निवासाच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या शाळा निवडू शकतात.
- ऑनलाईन अर्ज करताना पालकांना पाल्याच्या निवास स्थानापासून नवीन नियमानुसार 3 किमी व त्याच्या आतील उपलब्ध शाळा पोर्टलवर दिसतील.
- पालकांना प्रवेशाकरिता जास्तीत-जास्त कोणत्याही १० शाळांचे पर्याय निवडता येतील.
- निवड करताना घरापासून शाळेचे अंतर गुगल मॅपद्वारे मोजले जाते, त्यामुळे पोर्टलवर लोकेशन (बलून) अचूक निश्चित करणे गरजेचे आहे.
तुमच्या जिल्ह्यातील RTE शाळांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी RTE School List Maharashtra 2026 हा लेख जरूर वाचा.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक २०२६ | RTE Admission Important Dates
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून व पुढील वर्षांकरिता (RTE Admission Maharashtra) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
बालकांच्या २५ टक्के राखीव जागांवरील ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून, अंतिम तारीख 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
6 एप्रिल रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली असून, 10 एप्रिल 2026 रोजी RTE लॉटरी लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा? | How to Apply Online (RTE Admission Maharashtra)
प्रवेशासाठी शासनाच्या अधिकृत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे.
पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना पाल्याचा घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र यासारखी माहिती अचूक भरावी.
नवीन नियमानुसार, पालकांनी अर्ज भरतानाच सर्व अनिवार्य कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
एकापेक्षा अधिक (Duplicate) अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, त्यामुळे एकच परिपूर्ण अर्ज भरावा.
Step-by-Step अर्ज प्रक्रिया समजून घेण्यासाठी How to Apply Online RTE Admission Maharashtra हा मार्गदर्शक पुस्तिका पाहा.
लॉटरी पद्धत आणि निकाल | RTE Lottery Draw Results
प्रवेश प्रक्रियेची 6 एप्रिल 2026 रोजी एकत्रित संगणकीय सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे.
3 किमी व त्यापेक्षा कमी अंतरातील शाळांसाठी उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास, प्रथम फेरीतच लॉटरी प्रक्रिया पूर्ण केली जाते. लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकाच शाळेचे अलॉटमेंट (Allotment) होते आणि तसा SMS पालक व शाळेला पाठवला जातो.
प्रवेशासाठी उपलब्ध जागांएवढीच एक प्रतीक्षा यादी (Waiting List) देखील तयार केली जाते.
RTE (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५% मोफत प्रवेशासाठी जेव्हा उपलब्ध जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त असते, तेव्हा पारदर्शक पद्धतीने प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘लॉटरी पद्धत‘ वापरली जाते. ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी संगणकीय प्रणाली (Software) आणि प्रत्यक्ष चिठ्ठ्या काढण्याची पद्धत अशा दोन टप्प्यांत पार पडते.
१. प्रत्यक्ष लॉटरी प्रक्रिया (Physical Process)
ही प्रक्रिया एका सार्वजनिक सभागृहात (Auditorium) सर्वांसमोर पार पाडली जाते.
- अंकांचे बाऊल्स: शाळेला आलेल्या जास्तीत जास्त अर्जांच्या संख्येनुसार (उदा. ५९९ अर्ज असतील तर ३) बाऊल्स ठेवले जातात.
- चिठ्ठ्या काढणे: उपस्थित पालकांपैकी एकाला बोलावून प्रत्येक बाऊलमधून एक-एक अंक (एकक, दशक, शतक स्थानी) काढला जातो.
- क्रमांक निश्चिती: हे काढलेले अंक एका विशिष्ट टेबलमध्ये नोंदवले जातात, ज्यावरून सॉफ्टवेअरमध्ये निवडीचा क्रम ठरतो.
२. सॉफ्टवेअर लॉजिक आणि निवड (System Logic)
चिठ्ठ्यांद्वारे मिळालेले अंक सिस्टममध्ये भरल्यानंतर ‘GENERATE LOTTERY’ बटण दाबून निकाल तयार होतो.
- अंतराचे प्राधान्य: सर्वात आधी शाळेपासून 3 किमी त्रिज्येतील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. त्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास २-३ किमी अंतरावरील विद्यार्थ्यांची निवड होते.
- निवड क्रम: सॉफ्टवेअर सर्व अर्जांना त्यांच्या मूळ फॉर्म नंबरनुसार १ ते शेवटपर्यंत सीरियल नंबर देते. लॉटरी टेबलमधील अंकांनुसार या यादीची फेररचना करून ‘वरून खाली’ (Top to Bottom) या क्रमाने जागांचे वाटप केले जाते.
उदाहरण (शाळा निवड प्रक्रिया)
समजा, एका शाळेची एकूण प्रवेश क्षमता ३०० आहे. नियमानुसार, तिथे ७५ जागा (२५%) आरक्षित आहेत.
- अर्जांची स्थिती: जर त्या शाळेसाठी 3 किमी अंतरातून १०० अर्ज आले असतील, तर ७५ जागांसाठी लॉटरी काढली जाईल.
- लॉटरी क्रमांक: समजा लॉटरी टेबलमध्ये पहिला क्रमांक ‘२४९’ निघाला, तर ज्या विद्यार्थ्याचा सीरियल नंबर २४९ आहे, त्याला निवडीत पहिले प्राधान्य मिळेल.
- अंतिम निवड: अशाच प्रकारे लॉटरी टेबलमधील क्रमानुसार पहिल्या ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
एकापेक्षा जास्त शाळा: जर एखाद्या विद्यार्थ्याने ५ शाळा निवडल्या असतील, तर त्याचे नाव पाचही शाळांच्या यादीत येऊ शकते; त्याला कोणत्याही प्रक्रियेतून आपोआप वगळले जात नाही.
RTE लॉटरी निकाल कसा तपासायचा याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी RTE Lottery Result Maharashtra 2026 हा लेख वाचा.
प्रवेश निश्चितीची प्रक्रिया | RTE Admission Confirmation
शाळा अलॉट झाल्यानंतर पालकांनी अलॉटमेंट लेटर व पोर्टलवर अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि २ साक्षांकित (Attested) प्रती घेऊन विहित मुदतीत शाळेत जाणे बंधनकारक आहे.
- शाळेकडून प्रवेशाकरिता सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- शाळेने विद्यार्थ्याला प्रवेशित केल्यास किंवा नाकारल्यास त्याची प्रिंट पावती पालकांना दिली जाईल.
निष्कर्ष
RTE Admission Maharashtra ही योजना केवळ मोफत प्रवेशाची संधी नाही, तर सामाजिक न्याय आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्रत्यक्षात आणण्याचे साधन आहे. योग्य माहिती, कागदपत्रांची तयारी आणि वेळेत अर्ज केल्यास पालक आपल्या मुलासाठी उत्तम शैक्षणिक संधी निर्माण करू शकतात.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत परिपत्रके, वयोमर्यादा नियम आणि कागदपत्रांची यादी काळजीपूर्वक तपासणे अत्यावश्यक आहे. योग्य मार्गदर्शन आणि अचूक माहितीमुळे प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि यशस्वी होऊ शकते.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील इतर लेख अवश्य वाचा
- RTE 25% प्रवेशासाठी शुल्क प्रतिपूर्ती दर जाहीर – शासन निर्णय
- शाळा प्रवेशाच्या इयत्ता पहिली आणि प्ले ग्रुप साठी बालकाचे वय नेमके किती? नवीन वयोमार्यादा जाणून घ्या
- आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित; या मानवी दिनांकावर ठरणार वयोमार्यादा
FAQ: नेहमी विचारले जाणारे प्रश्न
कोणते विद्यार्थी आरटीईसाठी पात्र आहेत?
ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे (आर्थिक दुर्बल घटक) आणि जे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग, अनाथ किंवा कोविड प्रभावित यांसारख्या ‘वंचित गटात’ मोडतात, ते विद्यार्थी पात्र आहेत.
RTE चे पूर्ण रूप मराठीत काय आहे?
RTE चे पूर्ण रूप ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम’ (Right to Education) असे आहे.
महाराष्ट्रात आरटीईसाठी वयोमर्यादा किती आहे?
शासनाने वयोमर्यादेसाठी ३१ डिसेंबर हा मानीव दिनांक निश्चित केला असून, पूर्व प्राथमिकसाठी किमान ३ वर्षे आणि पहिलीसाठी किमान ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
आरटीई प्रवेशासाठी इयत्ता पहिलीसाठी वयोमर्यादा किती आहे?
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय ३१ डिसेंबर रोजी किमान ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
जर आरटीई अर्ज नाकारला गेला तर काय होईल?
शाळेने कागदपत्रे किंवा इतर कारणास्तव प्रवेश नाकारल्यास, पालकांना ऑनलाईन तक्रार (Grievance) नोंदवता येते. या तक्रारीवर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी आणि मनपा/नपा स्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांना असतात.
२५% आरटीई म्हणजे काय?
२५% आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित आणि इतर मान्यताप्राप्त खाजगी शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व-प्राथमिक वर्गात दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा मोफत शिक्षणासाठी राखीव ठेवणे होय.
एलकेजीसाठी योग्य वय काय आहे?
शासकीय परिपत्रकानुसार ‘प्ले ग्रुप / नर्सरी (इ. १ली पूर्वीच्या ३ रा वर्ग)’ साठी बालकाचे किमान वय ३१ डिसेंबर रोजी ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

