School Holiday Letter महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) परिपत्रक जारी करून स्पष्ट केले आहे की, 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना कोणतीही सुट्टी नसणार आहे. या दोन दिवशी शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
School Holiday Letter
महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय संघाच्या निवेदनानुसार, शाळांच्या टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणीमध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद ठेवणेबाबत निवेदन देण्यात आले होते.
मात्र शिक्षण संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार 8 आणि 9 जुलै रोजी कोणत्याही कारणास्तव शाळा बंद राहणार नाहीत असे शिक्षण संचालनालयाने आता स्पष्ट केले आहे.
