Shalarth Thakit Bill: थकित देयके या तारखेपर्यंत निकाली निघणार, थकीत बिल किती मिळणार? चेक करा

Published On: March 5, 2026
Follow Us
Shalarth Thakit Bill

शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रलंबित थकीत देयके 15 ते 20 मार्चदरम्यान निकाली काढली जातील, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणती थकीत देयके प्रलंबित आहेत?

शालेय शिक्षण विभागातील नियमित वेतन, मंजूर अनुदान, तसेच न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित थकीत देयके प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली.

1 ते 6 वर्षे आणि 6 वर्षांपेक्षा अधिक कालावधीची देयके स्वतंत्रपणे तपासली जात आहेत. जिल्हानिहाय थकीत देयकांचा तपशील संकलित करण्यात आला असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

शालार्थ प्रणालीद्वारे थकीत देयके ऑनलाइन सादर करणे अनिवार्य

सन २०२४-२५ पासून शासन निर्णयानुसार सर्व थकीत देयके ऑनलाइन शालार्थ प्रणालीतून सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्याध्यापक (DDO) स्तरावरून बिलांची नोंद व अपलोड प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर टप्प्याटप्प्याने पडताळणी करून देयके मंजुरीसाठी पुढे पाठवली जात आहेत.

हे ही वाचा: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द? परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश जारी

महत्त्वाच्या तारखा व अंतिम मुदत

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याबाबत शासनाने निश्चित कालमर्यादा दिली होती. 10 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाइन सादरीकरणाची मुदत देण्यात आली होती.

त्यानंतर 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत पडताळणी करून प्रस्ताव पुढे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीनंतर सादर होणारी थकीत देयके स्वीकृत केली जाणार नाहीत, असा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे.

6 वर्षांवरील थकीत देयकांसाठी स्वतंत्र प्रक्रिया

सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीची थकीत देयके शासनाकडे विवरणपत्र-3 द्वारे ऑनलाइन सादर करावी लागतील. प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रांची काटेकोर तपासणी करणे अनिवार्य आहे.

ऑनलाइन प्रस्ताव फॉरवर्ड केल्यानंतर त्याच्या दोन प्रती ऑफलाइन स्वरूपात संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, नियमानुसार सादर केलेली थकीत देयके थांबवली जाणार नाहीत. आवश्यक निधी उपलब्ध असून, पात्र प्रकरणे कायद्याच्या चौकटीत निकाली काढली जातील.

मात्र, दिलेली कालमर्यादा न पाळल्यास देयके प्रलंबित राहण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी किंवा स्तरावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन आर्थिक वर्षात नियमित वेतन वितरणाला प्राधान्य दिले जाणार आहे.

थकीत देयके बिल किती मिळणार? चेक करा

थकीत देयके बिल चेक करण्यासाठी खाली दिलेल्या कॅल्क्युलेटर मध्ये तुमचे थकीत महिन्याचे बेसिक पगार, महागाई भत्ता, घरभाडे, वाहन भत्ता आणि एकूण थकीत महीने टाका आणि चेक करा.

Salary & Thakit Bill Calculator

टीप: ७ व्या वेतन आयोगानुसार TA वर देखील DA लागू होतो.

15 ते 20 मार्चदरम्यान थकीत देयकांचा निपटारा होणार

15 ते 20 मार्चदरम्यान थकीत देयकांचा निपटारा होणार असल्याने राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढून भविष्यात थकीत देयकांचा प्रश्न कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शालेय शिक्षण विभागातील प्रलंबित थकीत देयके निकाली काढण्यासाठी शासनाने निश्चित कालमर्यादा जाहीर केली आहे. ऑनलाइन शालार्थ प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे. संबंधितांनी दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करून पडताळणी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा देयके मंजुरीस अडथळा निर्माण होऊ शकतो.

शालार्थ वेतन अपडेट

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment