TAIT Hall Ticket 2025 : टेट परीक्षेसाठी हॉल तिकीट वेब लिंक जाहीर

Published On: May 23, 2025
Follow Us
TAIT Hall Ticket 2025

TAIT Hall Ticket 2025 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच टेट परीक्षेचे प्रवेशपत्र (TAIT Admit Card 2025) वेब लिंक उपलब्ध झाली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.

TAIT Exam Date 2025 सुधारित तारखा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा आता 27 ते 30 मे 2025 आणि 2 ते 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात येतील.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे TAIT 2025 परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जात आहे. यापूर्वी 25 एप्रिल 2025 रोजीच्या अधिसूचनेद्वारे 24 मे 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत परीक्षा घेण्याचे सूचित करण्यात आले होते, ज्यामध्ये उमेदवारांची संख्या आणि उपलब्ध भौतिक सुविधांनुसार बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

TAIT Exam Mock Test Online Free

TAIT या परीक्षेची TAIT Mock Test Online Free परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

MAHA TAIT 2025 Syllabus

परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम

परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) या वरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी – मराठी अथवा इंग्रजी – उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील.

अभ्यासक्रम: सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परिक्षेसाठी निवडलेल्या पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.

MAHA TAIT Syllabus
  • अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्त्व इत्यादी उपघटक राहतील.
  • बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. सदर परीक्षाही विषयज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तरमर्यादा असणार नाही.

परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा (१२० मिनिटे) कालावधी राहील.

TAIT Hall Ticket 2025 – डायरेक्ट लिंक

ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आता निश्चित केलेल्या तारखांनुसार, उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेळोवेळी दिलेल्या सूचना, प्रवेशपत्रावरील माहिती आणि परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.

TAIT 2025 प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करण्याची प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर TAIT 2025 परीक्षेची प्रवेशपत्रे लवकरच उपलब्ध होतील. तुम्ही खालील सोप्या टप्प्यांमध्ये तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाइट www.mscepune.in येथे जा.
  2. प्रवेशपत्राची लिंक शोधा: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)-2025 यावर क्लिक करा. यामध्ये MAHA TAIT Hall Ticket 2025 अशी वेब लिंक शोधा.
  3. लॉगिन माहिती प्रविष्ट करा: लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा नोंदणी आयडी (Registration ID) आणि पासवर्ड (Password) टाकून, Security Code टाका आणि लॉगिन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा: आवश्यक माहिती भरल्यानंतर, तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते काळजीपूर्वक तपासा आणि डाउनलोड करा.
  5. प्रिंटआउट घ्या: भविष्यातील वापरासाठी आणि परीक्षेच्या दिवशी सोबत नेण्यासाठी प्रवेशपत्राच्या किमान दोन प्रती (प्रिंटआउट) काढून घ्या. रंगीत प्रिंटआउट काढणे अधिक सोयीचे ठरू शकते.

हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक

TAIT Hall Ticket 2025

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment