Teacher Transfer Update: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. या बदलांमुळे शिक्षक बदली प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
Table of Contents
Teacher Transfer Update
महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांवर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात १७ मार्च, २०२५ रोजी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे.
राज्यातील शिक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्न व समस्यांवर ग्रामविकास आणि पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्षक बदली प्रक्रिया (OTT – Online Teacher Transfer) , अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या, आंतरजिल्हा बदल्या, पदोन्नती आणि इतर महत्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. ग्रामविकास विभागाने या निर्णयांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीचे सुधारित बदली नियम खालीलप्रमाणे
जिल्हांतर्गत: सुधारित बदली नियम
- सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी, ३० जून २०२५ पर्यंत ५३ वर्षे पूर्ण करणारे शिक्षक विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र असतील.
- ज्या शाळा २०२२ मध्ये अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात रूपांतरित झाल्या आहेत आणि ज्या शाळांमधील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी ३ वर्षे सलग सेवा पूर्ण केली आहे, त्यांना ग्रामविकास विभागाच्या १८.६.२०२४ च्या शासन निर्णयानुसार, २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये विशेष संधी मिळेल.
- विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नत्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी टप्पा क्र. ७ लागू करण्यात येणार आहे.
- निवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ मधून बदलीसाठी पात्र ठरवले जाईल.
राज्यात 18,800 शिक्षकांची पदभरती – शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती
आंतरजिल्हा: सुधारित बदली नियम
- सन २०२५ मध्ये नवीन शिक्षक भरती होणार असल्याने, २३.८.२०२३ च्या पत्रानुसार, २३.५.२०२३ च्या शासन निर्णयातील २.८ मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हा बाहेर जाण्यासाठी रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. हा नियम आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ साठी शिथिल करण्यात आला आहे.
- शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी, पुरेसे नवीन शिक्षक उपलब्ध असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
- आंतरजिल्हा बदलीसाठी, ३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारावर रिक्त जागा दर्शविल्या जातील.
- ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील, तेथे इतर जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही.
हे नवीन नियम शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहेत, ज्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी
- अधिक माहितीसाठी: ग्रामविकास विभागाचे परिपत्रक वाचा
- दिनांक 17 मार्च 2025 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त सविस्तर वाचा
- Online Teacher Transfer Portal: https://ott.mahardd.com/