School Admission Age Limit 2026 : शाळा प्रवेशाच्या इयत्ता पहिली आणि प्ले ग्रुप साठी बालकाचे वय नेमके किती असावे? याबाबत इयत्ता पहिली प्रवेश वय 2026 27 शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेला आहे. त्यानुसार सध्या राज्यातील RTE Admission Age Limit बाबत कळविण्यात आले आहे. सविस्तर पाहूया..
Table of Contents
नवीन शैक्षणिक वर्ष 2026 27 शाळा कधी सुरू होणार?
शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ मध्ये विदर्भ तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ रोजी सुरू करण्याबबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ ते २९ जून, २०२६ पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५ या वेळेत सुरू करण्यात याव्यात. मंगळवार दि. ३०/०६/२०२६ पासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात अशा सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.
इयत्ता पहिली प्रवेश वय 2026 27
राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते.
तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.
सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार ३१ जुलै हा मानिव दिनांक गृहीत धारण्याबाबत निर्णय दिलेला आहे. बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिक (इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) (प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी) साठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता १ ली साठी ६ वर्षे पूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : नवीन शैक्षणिक वर्षातील शालेय सुटयांची यादी जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक
इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे, तर प्ले ग्रुपसाठी तीन वर्षांची अट
School Admission Age Limit : दिनांक सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

सदर आदेश राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
Age Calculator: 31 डिसेंबर रोजीचे वय काढा
Age Calculator (31 December)
इयत्ता पहिली प्रवेश वय 2020 शासन निर्णय
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा








