महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 2026 चे वेळापत्रक जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक

Published On: November 28, 2025
Follow Us
MPSC Time Table 2026 PDF Download

MPSC Time Table 2026 PDF Download: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सन २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. वेळापत्रक mpsc.gov.in आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकात सन २०२५ च्या मुख्य परीक्षांसह २०२६ च्या विविध सेवांच्या पूर्व व मुख्य परीक्षांच्या संभाव्य तारखांचा समावेश आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 2026 चे वेळापत्रक जाहीर

MPSC ने जाहीर केलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार, सन २०२५ मधील प्रमुख मुख्य परीक्षा २०२६ च्या सुरुवातीला होणार आहेत:

राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२५: ही परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, तिचा निकाल जुलै २०२६ मध्ये अपेक्षित आहे.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २०२५: ही परीक्षा ०५ मे ते ०९ मे २०२६ दरम्यान होणार असून, तिचा निकाल ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर होईल.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षा – २०२५: ही परीक्षा १७ मे २०२६ रोजी घेण्यात येईल आणि तिचा निकाल सप्टेंबर २०२६ मध्ये अपेक्षित आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २०२५: ही परीक्षा ०७ जून २०२६ रोजी आयोजित केली आहे व तिचा निकाल सप्टेंबर २०२६ मध्ये जाहीर होईल.

२०२६ मधील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा:

सन २०२६ च्या परीक्षांसाठी आयोगाने पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना पुढील वर्षीच्या महत्त्वाच्या तारखांची कल्पना आली आहे. हा MPSC Time Table 2026 सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: (शासनाच्या विविध विभागातील गट-अ व गट-ब संवर्ग) ही पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी घेण्यात येईल.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६: ही परीक्षा १४ जून २०२६ रोजी आणि तिची मुख्य परीक्षा ०५ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६: ही परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी होईल व तिची मुख्य परीक्षा १३ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६: २०२६ च्या मुख्य परीक्षांचे वेळापत्रक ०३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ठेवण्यात आले असून, तिचा निकाल फेब्रुवारी २०२७ मध्ये अपेक्षित आहे.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२६: ही परीक्षा डिसेंबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात (२६ ते ३० डिसेंबर) होणार आहे.

आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना

आयोगाने स्पष्ट केले आहे की हे वेळापत्रक केवळ अंदाजित आहे आणि जाहिरात तसेच परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी मागणीपत्र विहित वेळेत प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे हे वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून मागणीपत्र मिळाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकानुसार परीक्षा घेणे शक्य होईल.

कोणत्याही बदलांची माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. आयोगाच्या धोरणानुसार, परीक्षेची योजना, अभ्यासक्रम आणि निवड पद्धत वेळोवेळी संकेतस्थळावर अद्ययावत केली जाईल. हा MPSC Time Table 2026 उमेदवारांना त्यांच्या तयारीचे अचूक नियोजन करण्यासाठी मदत करेल.

MPSC Time Table 2026 PDF Download

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सन २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक PDF खालील लिंकवर Download करा.

MPSC Time Table 2026 PDF Download

MPSC Time Table 2026 PDF
MPSC Time Table 2026 PDF
MPSC Time Table 2026 PDF
MPSC Time Table 2026 PDF
MPSC Time Table 2026 PDF
MPSC Time Table 2026 PDF

अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment