राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Published On: January 14, 2026
Follow Us
Zp Election In Maharashtra 2026

महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली असून, ग्रामीण भागात आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे. या (Zp Election In Maharashtra 2026) साठी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १,४६२ पंचायत समिती जागांसाठी ही रणधुमाळी पाहायला मिळेल.

अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन मागील काही निवडणुकांमध्ये ऑनलाईन अर्जांमुळे झालेला गोंधळ टाळण्यासाठी, यावेळी निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. उमेदवारांना आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येणार आहेत. मात्र, राखीव जागांवर लढणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा देणे बंधनकारक असेल.

विशेष सुविधा आणि ‘पिंक मतदान केंद्र’ मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आयोगाने जय्यत तयारी केली आहे:

  • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी रॅम्प आणि व्हिलचेअरची सुविधा.
  • जिथे महिला मतदारांची संख्या जास्त आहे, तिथे ‘पिंक मतदान केंद्रे’ उभारली जातील. या केंद्रांवर फक्त महिला अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असतील.
  • सुमारे २५,४८२ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान पार पडेल.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक (महत्वाच्या तारखा)

या (Zp Election In Maharashtra 2026) प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत, याची मतदारांनी आणि उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • अर्ज भरण्याची मुदत: १६ ते २१ जानेवारी २०२६
  • अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६
  • अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख: २७ जानेवारी २०२६
  • चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६
  • मतदान: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
  • मतमोजणी व निकाल: ९ फेब्रुवारी २०२६

खर्च मर्यादा आणि प्रचाराची मुदत मोठ्या जिल्हा परिषदांसाठी उमेदवारांना ९ लाख रुपये, तर मध्यम आकाराच्या परिषदांसाठी ७.५० लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पंचायत समितीसाठी ही मर्यादा ४.५० ते ६ लाखांपर्यंत असेल.

मतदारांनो, हे लक्षात ठेवा! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्याने, प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आणि दुसरे पंचायत समितीच्या गणासाठी असेल. तुमचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप आणि https://mahasecvoterlist.in/ ही वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment