महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (State CET Cell) ने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी BBA, BCA, BMS, आणि BHMCT या कोर्सेसच्या CET परीक्षेची अधिसूचना जाहीर केली आहे. 14 जानेवारी 2026 पासून नोंदणी सुरू झाली असून, यावर्षी ‘APAAR ID’ अनिवार्य करण्यात आला आहे.
बारावीची परीक्षा देणाऱ्या आणि मॅनेजमेंट किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासन, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (State CET Cell) ने MAH-BHMCT/BCA/BBA/BBM/BMS CET 2026 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे . ही परीक्षा शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील प्रवेशांसाठी घेतली जाणार आहे .
कोणत्या कोर्सेससाठी आहे ही CET?
खालील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही सामायिक प्रवेश परीक्षा (CET) देणे बंधनकारक आहे :
- Bachelor of Hotel Management & Catering Technology (BHMCT)
- Bachelor of Computer Application (BCA)
- Bachelor of Business Administration (BBA)
- Bachelor of Management Studies (BMS)
- Bachelor of Business Management (BBM)
- MBA (Integrated) आणि MCA (Integrated)
महत्त्वाच्या तारखा
CET सेलने दिलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, अर्जाची नोंदणी आणि परीक्षेच्या अंदाजित तारखा खालीलप्रमाणे आहेत.
- ऑनलाईन नोंदणी सुरू (Start Date) : 14 जानेवारी 2026
- नोंदणीची शेवटची तारीख (End Date) : 16 फेब्रुवारी 2026
- CET परीक्षेचा अंदाजित कालावधी : 28 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026
(टीप: परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.)
मोठा बदल: APAAR ID अनिवार्य!
यावर्षीच्या नोंदणी प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. APAAR ID आणि Aadhaar ID नोंदणीसाठी अनिवार्य (Mandatory) करण्यात आले आहेत .
ज्या विद्यार्थ्यांकडे अजूनही APAAR ID नाही, त्यांनी तो DigiLocker द्वारे त्वरित तयार करून घ्यावा, अशी सूचना देण्यात आली आहे .
अर्ज कोठे करायचा?विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिकृत अपडेट्स आणि सविस्तर माहितीसाठी नियमितपणे www.mahacet.org या वेबसाइटला भेट द्यावी .
ऑनलाईन अर्जाची लिंक आणि माहिती पुस्तिका (Information Brochure) याच वेबसाइटवर उपलब्ध आहे .
अधिक माहितीसाठी : CET Registration Notice BBA BCA BBM BMS CET 2026








