Mahajyoti Tab Yojana 2026 महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (MAHAJYOTI), महाराष्ट्र राज्य, नागपूर, इतर मागासवर्ग, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाज्योतीमार्फत JEE, NEET आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 18 महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार असून, पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि दररोज 6 जीबी इंटरनेट सेवा देखील पुरवली जाणार आहे. यासाठी Mahajyoti Tab Yojana Registration 2026 सुरू झाले असून, लेटेस्ट अपडेट नुसार 7 जून 2026 पर्यंत नोंदणी साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती पाहूया.
Mahajyoti Tab Yojana 2026 संपूर्ण माहिती
Mahajyoti Tab Yojana 2026 लाभाचे स्वरूप: प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असेल. प्रशिक्षणादरम्यान अभ्यासासाठी लागणारा टॅबलेट प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला मोफत दिला जाईल. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आवश्यक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी दररोज ६ जीबी डेटाची सुविधा दिली जाईल.
MAHAJYOTI Tablet योजनेच्या लाभासाठी पात्रता:
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
- सन २०२६ मध्ये इयत्ता १० वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थांना किमान ६० % व शहरी भागातील विद्यार्थांना किमान ७० % गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांची निवड १०वीच्या परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीनुसार, सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षणानुसार केली जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (पुढील व मागील बाजू)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
- इयत्ता १०वीची गुणपत्रिका
- इयत्ता ११वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व प्रवेश पावती
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
आरक्षण:
सामाजिक प्रवर्गानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:

- इतर मागास वर्ग (OBC): ५९%
- विमुक्त जाती – अ (VJ-A): १०%
- भटक्या जमाती – ब (NT-B): ८%
- भटक्या जमाती – क (NT-C): ११%
- भटक्या जमाती – ड (NT-D): ६%
- विशेष मागास प्रवर्ग (SBC): ६%
समांतर आरक्षणामध्ये महिलांसाठी ३०%, दिव्यांगांसाठी ४% आणि अनाथांसाठी १% जागा आरक्षित आहेत.
Mahajyoti Tab Registration 2026 अर्ज कसा करावा
महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन “Notice Board” मधील “Application for JEE/NEET/MHT-CET- Batch-2026-28 Training” यावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षरी करून स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात स्कॅन करून जोडावीत. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.)
महत्वाच्या अटी व शर्ती:
- Mahajyoti Tab Registration 2026 Last Date : अर्ज करण्याची अंतिम दि. 30/05/2026 होती मात्र नवीन अपडेट नुसार 7 जून 2026 पर्यंत नोंदणी साठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
- पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे आणि निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांच्याकडे राहतील.
- कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- अर्ज भरताना काही अडचण आल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा: ०७१२-२८७०१२०/२१.
या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तयारी करावी, असे आवाहन महाज्योती संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
महत्वाच्या लिंक
- महाज्योती अधिकृत परिपत्रक येथे डाउनलोड करा
- Mahajyoti Tab Registration 2026 डायरेक्ट लिंक
- महाज्योती मोफत टॅब संदर्भात डायरेक्ट लिंक : https://mahajyoti.org.in/application-of-jee-neet-mht-cet-batch-2026-28-training/
- महाज्योती अधिकृत वेबसाईट : https://mahajyoti.org.in/
प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया: या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड एका पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल.
- प्रशिक्षणासाठीची जाहिरात प्रसिद्ध करून ‘महाज्योती’ च्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील.
- प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल.
- त्यानंतर उमेदवारांच्या इयत्ता १० वी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- संवर्गनिहाय (Category-wise) आणि समांतर आरक्षणानुसार (Parallel Reservation) पात्र उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी Mahajyoti Tab Yojana 2026 या संधीचा लाभ घेण्यासाठी महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी आणि वेळेत अर्ज सादर करावा. हे प्रशिक्षण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.









