वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास स्थगिती MBBS PG BOND Relaxed

Published On: May 29, 2025
Follow Us
MBBS PG BOND Relaxed

MBBS PG BOND Relaxed शासकीय आणि निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (MD, MS) प्रवेश मिळवणं सोपं होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेत, पदवी पूर्ण झाल्यावर सक्तीची बंधपत्रित सेवा (बॉन्डेड सर्व्हिस) पूर्ण करण्याच्या धोरणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे हजारो एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

MBBS PG BOND Relaxed

काय होता जुना नियम?

२०१७ मध्ये शासनाने एक निर्णय घेतला होता, त्यानुसार शासकीय आणि महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना शासनाची ठराविक कालावधीची बंधपत्रित सेवा पूर्ण केल्याशिवाय एमडी, एमएस किंवा इतर कोणत्याही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नव्हता. २०१९-२० पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी हा नियम लागू करण्यात आला होता.

नवीन बदल काय आहे?

या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले होते, कारण बंधपत्रित सेवा पूर्ण न केल्यामुळे त्यांना पदव्युत्तर प्रवेश घेता येत नव्हता. याबाबत विद्यार्थी संघटनांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती आणि सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या अटीची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली जात नव्हती.

आता, यंदाची पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी या बंधपत्रित सेवेच्या अटीला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने बंधपत्रित सेवेसाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्ध करून द्यावयाच्या होत्या, मात्र उपलब्ध जागांचा विचार करता, पदव्युत्तर प्रवेशासाठी पदवी अभ्याक्रमानंतरची बंधपत्रित सेवा पूर्ण असणे या धोरणाला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना आता वेळेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ही स्थगिती कायम राहण्याची शक्यता आहे.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment