MAH BCA BBA BMS BBM CET 2025 अर्ज मुदतवाढ आणि परीक्षेच्या तारखा जाहीर

Published On: June 22, 2025
Follow Us
MAH BCA BBA BMS BBM CET 2025

MAH BCA BBA BMS BBM CET 2025 महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Cell, Maharashtra State, Mumbai) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी तंत्रशिक्षण विभागातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेल्या एमएएच-बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी-२०२५ (MAH-BCA/BBA/BMS/BBM CET-2025) या ऑनलाइन अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

MAH BCA BBA BMS BBM CET 2025

MAH BCA BBA BMS BBM CET 2025 साठी यापूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० जून २०२५ होती. मात्र, अनेक उमेदवार, पालक आणि संस्थांकडून आलेल्या विनंतीनुसार आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता , ही अंतिम तारीख आता २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या अतिरिक्त सीईटी परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा १९ जुलै २०२५ आणि २० जुलै २०२५ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आणि पालकांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन दिलीप सरदेसाई (भा.प्र.से.), आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा cetcell@mahacet.org या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता.

MAH BCA BBA BMS BBM CET 2025 Extension of Online Application Registration Date
MAH BCA BBA BMS BBM CET 2025 Examination date

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment