अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एकरकमी लाभ मंजूर, 29 कोटी रुपयांचा निधी वितरित Anganwadi Sevika Gratuity

Published On: July 22, 2025
Follow Us
Anganwadi Sevika Gratuity

Anganwadi Sevika Gratuity महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक ०१ एप्रिल २०२२ नंतर सेवानिवृत्त, मृत, राजीनामा दिलेल्या किंवा सेवेतून काढून टाकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासाठी २९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ नुसार, दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून ते ग्रॅज्युईटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून एकरकमी लाभ देण्यास मान्यता देण्यात आली होती. हा लाभ ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार दिला जाईल.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी, २२३६-पोषण आहार, ०२ पोषक अन्न व पेय वितरण, १०१-विशेष पोषण आहार कार्यक्रम, (०८) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, ०८) (०७) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (एलआयसी हप्ता) (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%) (कार्यक्रम) या लेखाशीर्षाखालील ३२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून २९ कोटी रुपयांचा निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे, दिनांक ०१ एप्रिल २०२२ नंतरच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत केली जाईल. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हा शासन निर्णय नियोजन विभाग (दिनांक ११ जून २०२५) आणि वित्त विभाग (दिनांक ०४ जुलै २०२५) यांच्या सहमतीनुसार हा शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2025 रोजी जारी करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

No Work No Pay New GR

काम नाही तर वेतन नाही हा नियम रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय! अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा!

January 31, 2026
Teacher Personal Approval NEW GR 2026

शिक्षक वैयक्तिक मान्यता प्रस्ताव सादर करताना ‘या’ 3 बाबींची होणार कडक तपासणी – शासन निर्णय जारी

January 31, 2026
7th Pay Commission Salary Fixation New GR

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींवर शासनाचा मोठा निर्णय!

January 30, 2026
Anganwadi Sevika January Salary 2026

खुशखबर: अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन वितरणासाठी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

January 30, 2026
ICDS Employee Salary GR

गुड न्यूज! ICDS कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याच्या पगारासाठी निधी वितरीत; शासन निर्णय निर्गमित

January 30, 2026
ZP Arogya Sevika Regularization New GR 2026

जिल्हा परिषद आरोग्य सेविकांच्या सेवा नियमित करण्याचे सुधारित आदेश जारी

January 29, 2026

Leave a Comment