CET Cell Help Centers List महाराष्ट्र CET कडून ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ जाहीर, संपूर्ण यादी

Published On: July 24, 2025
Follow Us
CET Cell Help Centers List

CET Cell Help Centers List महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती, मार्गदर्शन तसेच येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) २३ जुलै २०२५ रोजी ही घोषणा केली आहे.

CET Cell Help Centers List Maharashtra

ही केंद्रे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खालील नमूद केलेल्या संस्थांमध्ये उपलब्ध असतील:

  • जळगाव: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
  • नाशिक: क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक
  • नंदुरबार: श्री गोवर्धनसिंहजी शैक्षणिक सेवा समितीचे पीजी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नंदुरबार
  • अहिल्यानगर: विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, सरोलबद्दी, अहिल्यानगर
  • धुळे: श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. बापूसाहेब शिवाजी राव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, धुळे
  • पुणे: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे
  • सातारा: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड
  • सांगली: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली
  • सोलापूर: वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर
  • कोल्हापूर: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर
  • नागपूर: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर
  • वर्धा: बजाज इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, वर्धा
  • चंद्रपूर: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर
  • भंडारा: मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग अॅड टेक्नॉलॉजी, भंडारा
  • गोंदिया: शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया
  • गडचिरोली: शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली
  • अकोला: अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला
  • अमरावती: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
  • वाशिम: सन्मती इंजिनिअरींग कॉलेज, वाशिम
  • बुलढाणा: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव
  • यवतमाळ: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ
  • मुंबई शहर: व्ही. जे. टी.आय. माटुंगा, मुंबई
  • मुंबई उपनगर: पटेल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, अंधेरी
  • ठाणे: व्हि.पी.एम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, ठाणे
  • पालघर: सेज जॉन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पालघर
  • रायगड: डॉ. बाबासोहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
  • रत्नागिरी: लाकेनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग: एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली
  • बीड: नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालय, परळी, बीड
  • छत्रपती संभाजीनगर: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
  • धाराशिव: तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
  • जालना: इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई मराठवाडा परिसराबाहेर, जालना
  • लातूर: एम एस बिडवे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, लातूर
  • नांदेड: श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड
  • परभणी: ज्ञानोपासक शिक्षण मंडळाची माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था, परभणी
  • हिंगोली: शासकीय तंत्रनिकेतन, हिंगोली

विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता:

http://www.mahacet.org. संपर्क क्रमांक: ०२२-२२०१६१५९ , ईमेल: cetcell@mahacet.org.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment