Health Department New Scheme जागतिक आरोग्य दिन 2025 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नवीन योजनांचा शुभारंभ, डिजिटल पायाभूत सुविधा, आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की,
“आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोणताही नागरिक वंचित राहता कामा नये.”
याचवेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी आवाहन केले की,
“सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यबुद्धीने सेवा केली पाहिजे.”
कार्यक्रमाचा समारोप ‘आरोग्यं धनसंपदा’ या मंत्राने करण्यात आला आणि राज्याच्या आरोग्य सेवेसाठी नव्या संकल्पांची पुन्हा उजळणी झाली.
Table of Contents
Health Department New Scheme शुभारंभ झालेल्या योजनांची यादी

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य सुविधांचा डिजिटल आणि भौतिक स्तरावर मोठा विस्तार झाला आहे:
🔹 e-Sushrut (HMIS System) संकेतस्थळाचे विस्तारीकरण
🔹 महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणाली (Bombay Nursing Home Act) अंतर्गत ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण
🔹 6 जिल्ह्यांतील 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ
🔹 आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी ऑनलाईन संनियंत्रण सॉफ्टवेअरचे उद्घाटन
🔹 गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती अभियान (9 ते 14 वयोगटासाठी)
🔹 म.ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता कामगारांसह सर्वांसाठी खुली
🔹 CPR प्रशिक्षणाचे उद्घाटन आणि प्रात्यक्षिक सादरीकरण
🔹 आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ
आरोग्य सेवा क्षेत्रातील गौरव व पुरस्कार
राज्यातील विविध जिल्ह्यांतील आरोग्य संस्थांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे खालील सन्मान पटकावले: उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हे खालीलप्रमाणे
राष्ट्रीय अंधत्व निवारण
- प्रथम – बीड
- द्वितीय – धाराशीव
कुटुंब नियोजन
- प्रथम – नांदेड
- द्वितीय – पालघर, लातूर महानगरपालिका
शस्त्रक्रिया केंद्र
- 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय: प्रथम – गडहिंग्लज (कोल्हापूर), द्वितीय – अचलपूर
- 50 खाटांचे: प्रथम – देगलूर (नांदेड), द्वितीय – गंगाखेड (परभणी)
- ग्रामीण रुग्णालय: प्रथम – अहमदपूर (लातूर), द्वितीय – माहूर (नांदेड)
गुणवत्ता आश्वासन
- प्रथम – लातूर
- द्वितीय – धाराशीव
प्रसुती सेवा
- PHC (ग्रामीण): प्रथम – साईवन (पालघर), द्वितीय – शेंदूर्णी (जळगाव)
- नागरी PHC: आकुर्डी (पिंपरी चिंचवड मनपा)
- ग्रामीण रुग्णालय: प्रथम – धडगाव (नंदुरबार), द्वितीय – सस्तूर (धाराशीव)
आरबीएसके
RBSK कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणारा जिल्हा
- प्रथम – कोल्हापूर
- द्वितीय – पुणे
असंसर्गजन्य आजार
- प्रथम – सातारा
- द्वितीय – वाशीम
सिकल सेल नियंत्रण
- प्रथम – नागपूर
- द्वितीय – नाशिक
विशेष नवजात शिशु काळजी (SNCU)
- प्रथम – डागा रुग्णालय, नागपूर
- द्वितीय – उपजिल्हा रुग्णालय, जव्हार (पालघर)
पोषण पुनर्वसन केंद्र (NRC)
- प्रथम – पांढरकवडा (यवतमाळ)
- द्वितीय – हिंगोली
मोबाईल मेडिकल यूनिट
- प्रथम – ठाणे
- द्वितीय – नांदेड
बाल व मातामृत्यू कमी करणारे जिल्हे
- बालमृत्यू: धाराशीव
- मातामृत्यू: रायगड
डायलिसीस सेवा
- प्रथम – चंद्रपूर
- द्वितीय – गडचिरोली
अतिदक्षता कक्ष (ICU)
- जिल्हा रुग्णालय – धुळे
क्षयरोग नियंत्रण
- जिल्हा: प्रथम – गोंदिया, द्वितीय – धाराशीव
- महानगरपालिका: प्रथम – मालेगाव, द्वितीय – धुळे
कष्ठरोग निर्मूलन
- प्रथम – चंद्रपूर
- द्वितीय – सातारा
प्रशासकीय कामगिरी
- जिल्हा आरोग्य अधिकारी: प्रथम – अकोला, द्वितीय – धाराशीव
- शल्य चिकित्सक: प्रथम – वाशीम, द्वितीय – नाशिक
- महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी: प्रथम – सांगली, द्वितीय – पिंपरी चिंचवड
अन्य उल्लेखनीय कामगिरी
- महिला रुग्णालय: प्रथम – अकोला, द्वितीय – अमरावती
- 100 खाटांचे रुग्णालय: प्रथम – कराड (सातारा), द्वितीय – शहापूर (ठाणे)
- किडनी ट्रांसप्लांट: विभागीय रुग्णालय – अमरावती
- आयुष्मान भारत डिजिटल मिशन: ग्रामीण – हिंगोली, शहरी – पनवेल महानगरपालिका
निष्कर्ष
महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात चालू असलेला हा विकास आरोग्य सेवांमध्ये एक सकारात्मक क्रांती घडवतो आहे. हीच दिशा कायम राहील, तर ‘आरोग्यं धनसंपदा’ या विचारांची खरी पूर्तता होईल.