HTEDU Dashboard Launch 2025 राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘डॅशबोर्ड’ विकसित करण्यात आला आहे. dashboardhtedu.maharashtra.gov.in या Dashboard चे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
HTEDU Dashboard Launch 2025
Higher and Technical Education Department Maharashtra Official Website: https://dashboardhtedu.maharashtra.gov.in/ हे पोर्टल महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत सविस्तर माहिती प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
या डॅशबोर्डमध्ये कोणत्या सुविधा मिळणार
या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी, परीक्षा, निकाल, विद्यापीठ संलग्नता, शिष्यवृत्ती, सार्वजनिक ग्रंथालये, आणि प्रकाशित संशोधन पत्रिका यांचा समावेश आहे. सध्या डॅशबोर्डवर २६ सार्वजनिक विद्यापीठे आणि १४ खाजगी विद्यापीठांच्या नोंदणी क्षेत्राचे डेटा उपलब्ध आहे.
संलग्नता, परीक्षा आणि निकाल या क्षेत्रांसाठी डेटा स्वयंचलितपणे पोर्टलवर पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. डॅशबोर्डच्या पुढील टप्प्यात, उर्वरित खाजगी विद्यापीठांचे सर्व क्षेत्रांसाठीचे तपशील देखील स्वयंचलित पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील. हा डॅशबोर्ड सरकारला समानता आणि समतेची हमी देणारी प्रभावी धोरणे तयार करण्यात मदत करेल.
या डॅशबोर्डमध्ये विद्यापीठांशी संबंधित प्रवेश प्रक्रिया, निकाल, शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शुल्क आणि महाविद्यालयांशी संबंधित संलग्नता व शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालय यांची माहिती समाविष्ट आहे. या डॅशबोर्डवर 26 सार्वजनिक विद्यापीठे व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा समावेश असून भविष्यात राज्यातील सर्व खासगी व सार्वजनिक विद्यापीठांचा समावेश डॅशबोर्डमध्ये करण्यात येणार आहे. हा डॅशबोर्ड उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध आहे.
या डॅशबोर्डमधील माहितीचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या शैक्षणिक बाबींकरिता खात्रीशीर अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजित असल्याची माहिती मंत्री श्री.पाटील यांनी दिली.
डॅशबोर्डवरील अधिक माहितीसाठी अवश्य भेट द्या: https://dashboardhtedu.maharashtra.gov.in/home