ITI Admission 2025 महाराष्ट्र राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) ऑगस्ट २०२५ सत्रासाठी शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (Craftsman Training Scheme) प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पद्धतीने सुरू झाली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या लेखात ITI Admission 2025 प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया, ITI Admission Link तसेच संपूर्ण Video संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहूया.
ITI Admission 2025 संपूर्ण माहिती
अर्ज करण्याची पद्धत:
राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून अर्ज स्विकृती केंद्र म्हणून कार्यरत आहेत. उमेदवार या केंद्रांवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्विकृती आणि निश्चिती करू शकतील. उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत लिंकवरील माहिती पुस्तिकेत नमूद केलेली माहिती आणि नियमांचा अभ्यास करूनच अर्ज सादर करावा. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल आणि सर्व ITI मध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्जात प्राथमिक मोबाईल नंबर नोंदवणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर एकच अर्ज नोंदवता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि OTP वेळोवेळी SMS द्वारे उमेदवारांना पाठवली जाईल, त्यामुळे अद्ययावत मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. हा क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही.
प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते तयार होईल आणि नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID असेल. उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात Login करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा, माहिती तपासावी आणि प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन जमा करावे. शुल्क भरल्यावर आणि अर्ज निश्चित करण्यापूर्वी माहितीत बदल करता येईल.
अर्ज शुल्क:
- राखीव प्रवर्ग: रु. १००
- अराखीव प्रवर्ग: रु. १५०
- महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार: रु. ३००
- अनिवासी भारतीय उमेदवार: रु. ५००
शुल्क भरल्यावर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची (Provisional Application Form) छापील प्रत घ्यावी.
अर्ज निश्चित करणे (Confirmation):
प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने अर्जातील माहितीच्या समर्थनार्थ आवश्यक मूळ कागदपत्रे, त्यांच्या छायांकित प्रतींचा एक संच आणि तात्पुरत्या प्रवेश अर्जाची प्रत नजिकच्या ITI मध्ये पडताळणीसाठी सादर करावी. आवश्यक कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर आणि माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध आहे. अर्ज स्विकृती केंद्रावरील अधिकारी मूळ कागदपत्रांवरून माहितीची तपासणी करतील आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती करण्यास सांगतील. तपासणीनंतर अर्ज निश्चित करून उमेदवाराला “अर्ज निश्चितीकरण पावती” आणि निश्चित केलेल्या अर्जाची प्रत दिली जाईल. अर्ज निश्चित झाल्यावर मूळ कागदपत्रे परत केली जातील. अर्ज निश्चित करण्यासाठी ITI मध्ये कोणतेही शुल्क देय नाही. शुल्क आकारल्यास किंवा कागदपत्रे परत न केल्यास मदत कक्षाशी संपर्क साधावा. निश्चित केलेल्या अर्जांचाच सर्व प्रवेश फेऱ्यांसाठी विचार केला जाईल.
अर्ज निश्चित केल्यावर माहितीत बदल करता येणार नाही, तथापि, प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत प्रवेश खात्यात Login करून काही निवडक माहितीत बदल करता येईल.
विकल्प व प्राधान्य सादर करणे:
अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य प्रवेश संकेतस्थळावर Login करून सादर करावे लागतील. Option Form भरल्यानंतर त्याची छापील प्रत घ्यावी.
महत्वाचे मुद्दे:
- उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सर्व अर्ज रद्द होतील आणि उमेदवाराला प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाईल.
- अनिवासी भारतीय आणि इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी १५ मे २०२५ पासूनच ऑनलाईन अर्ज आणि चौथ्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे आवश्यक आहे.
- प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र (Allotment Letter) ऑनलाईन उपलब्ध होईल. त्यांनी Login करून निवडपत्राची प्रिंट घ्यावी आणि प्रवेशासाठी निश्चित वेळेनुसार निवड झालेल्या संस्थेत उपस्थित राहावे. निवडपत्र संस्थेतूनही मिळू शकेल.
- प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास किंवा माहितीत तफावत आढळल्यास प्रवेश रद्द होईल आणि उमेदवार पुढील फेऱ्यांतून बाद होईल.
- प्रवेश खात्याचा पासवर्ड गोपनीय ठेवावा. पासवर्ड Reset करण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- २५० PPP अंतर्गत असलेल्या ITI मधील २०% जागा विशेष प्रशिक्षण शुल्क आकारून भरल्या जातील. यासाठी स्वतंत्र विकल्प द्यावा लागेल. शुल्क तपशील माहिती पुस्तिकेत उपलब्ध आहे.
- शासकीय ITI (PPP) मधील IMC जागा आणि खाजगी ITI मधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाने भरल्या जाणाऱ्या जागांवर प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू आहे. योजनेची माहिती माहिती पुस्तिकेत आणि संकेतस्थळावर आहे.
- ज्या शासकीय ITI मधील व्यवसायांत ५०% पेक्षा कमी प्रवेश झाले असतील, तेथील उमेदवारांना त्याच किंवा जवळील इतर शासकीय ITI मध्ये सामावून घेतले जाऊ शकते.
- सर्व शासकीय आणि खाजगी ITI मधील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच होतील. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त घेतलेले प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी खाजगी ITI कायम विनाअनुदानित तत्वावर शासन मान्यताप्राप्त व NCVT शी संलग्न आहेत. येथील उमेदवारांची परीक्षा शासकीय ITI प्रमाणेच घेऊन NTC प्रमाणपत्र दिले जाते. खाजगी ITI मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी ती संस्था NCVT संलग्न आहे का, हे NCVT-MIS पोर्टलवर (www.ncvtmis.gov.in) तपासावे. असंलग्नीत तुकड्यांची परीक्षा संचालनालयामार्फत घेतली जाणार नाही.
- सर्व शासकीय व मान्यता प्राप्त खाजगी ITI आणि संलग्न व्यवसायांची यादी https://admission.dvet.gov.in, www.dvet.gov.in आणि www.ncvtmis.gov.in येथे उपलब्ध आहे.
ITI Admission 2025 वेळापत्रक
- ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, दुरुस्ती करणे व शुल्क जमा करणे: १५ मे २०२५ पासून
- अर्ज स्विकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज निश्चित करणे: १७ मे २०२५ पासून
- पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे: २६ मे २०२५ पासून
- इ. १० वी ची गुणपत्रिका वितरीत झाल्यावर सविस्तर वेळापत्रक घोषित केले जाईल.
मार्गदर्शन सत्रे:
प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी ITI मध्ये १५ मे २०२५ पासून दररोज सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तांत्रिक किंवा इतर शंका असल्यास नजिकच्या ITI किंवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षाशी (सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) संपर्क साधावा. संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी.
ITI Admission Link
अधिक माहितीसाठी भेट द्या:
ITI Admission Brochure (आय.टी.आय प्रवेश माहिती पुस्तिका)
Complete Brochure (संपूर्ण माहिती पुस्तिका)
- ITI Admission Portal: https://admission.dvet.gov.in
- ITI Admission Link : https://admission.dvet.gov.in/
- ITI Admission 2025 : Video संपूर्ण माहिती एका क्लीकवर पाहा
- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय: www.dvet.gov.in
- NCVT-MIS पोर्टल: www.ncvtmis.gov.in
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेशाची सविस्तर “माहितीपुस्तिका – प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” १५ मे २०२५ पासून प्रवेश संकेतस्थळावर (https://admission.dvet.gov.in) Download Section मध्ये Pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.