MH 11th Admission Online 2025 26 शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी २०२५-२६ या आगामी शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार, आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अकरावीचे प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाने अधिकृत पोर्टल सुरू केले आहे.
MH 11th Admission Online 2025 26 महत्त्त्वाची सूचना
अनधिकृत माहितीपासून सावध राहा!
सध्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबद्दल काही अनधिकृत संकेतस्थळे (वेबसाइट्स) आणि सोशल मीडिया (डिजिटल माध्यमां) द्वारे माहिती प्रसारित होत आहे. ही माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकते. शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था/विद्यालये/कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन यांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळ किंवा डिजिटल माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती, माहितीवर अजिबात विश्वास ठेवू नका. या माहितीच्या आधारावर कोणताही प्रवेश अर्ज भरू नका किंवा कोणतीही प्रवेश प्रक्रिया करू नका.
महत्त्वाच्या तारखा:
- शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी नोंदणी: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता अकरावी करिता शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रियासाठी दिनांक १५ मे २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- पालक व विद्यार्थ्यांसाठी नोंदणी: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अकरावी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवार, दिनांक १९ मे २०२५ पासून झाली आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी की, अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि सूचनेनुसारच प्रवेश प्रक्रिया करावी. कोणत्याही फसव्या किंवा अनधिकृत माहितीला बळी पडू नये.
अधिकृत माहितीसाठी येथे संपर्क साधा:
शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की, अकरावी प्रवेशासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहितीच खरी आणि विश्वासार्ह आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही माहितीसाठी केवळ शासनाच्या अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहावे.
शासनाचे अधिकृत संपर्क तपशील खालीलप्रमाणे: 11th online admission Official website
- हेल्पलाइन क्रमांक: 8530955564
- अधिकृत वेबसाइट: https://mahafyjcadmissions.in
- ईमेल: support@mahafyjcadmissions.in
