Ladki Bahin Yojana Beneficiaries Ineligible महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी पात्र नसतानाही सदर लाभार्थी लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभागाने केलेल्या छाननीत सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचं निष्पन्न झालं आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, या अपात्र लाभार्थ्यांमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
Ladki Bahin Yojana Beneficiaries Ineligible काय आहे प्रकरण?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची पडताळणी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार, माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या अहवालातून गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.
- एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ: काही लाभार्थी एकाच वेळी शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेत होते.
- कुटुंबात २ पेक्षा जास्त लाभार्थी: काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेत होते, जे नियमांचे उल्लंघन आहे.
- पुरुषांनी केले अर्ज: धक्कादायक म्हणजे, काही ठिकाणी चक्क पुरुषांनीही “लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवला होता.
जून २०२५ पासून अपात्र लाभार्थ्यांचा सन्माननिधी थांबवला
या गंभीर गैरव्यवहारानंतर, जून २०२५ पासून या २६.३४ लाख अपात्र अर्जदारांचा योजनेचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सुमारे २.२५ कोटी पात्र लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी नियमितपणे वितरित करण्यात आला आहे.
पुढे काय होणार?
ज्या २६.३४ लाख लाभार्थ्यांचा सन्माननिधी तात्पुरता थांबवण्यात आला आहे, त्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सखोल चौकशी केली जाईल. या चौकशीत जे लाभार्थी खरोखरच पात्र ठरतील, त्यांचा लाभ शासनामार्फत पुन्हा सुरु केला जाईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या या बनावट लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असंही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणामुळे शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर आल्या असून, पुढील काळात अशा प्रकारचा गैरव्यवहार टाळण्यासाठी अधिक कडक नियम आणि पडताळणी प्रक्रिया लागू केली जाण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी : https://ladakibahin.maharashtra.gov.in/