Ladki Bahin Yojana Jun Installment महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा जुन 2025 या माहिन्याचा 12 वा हप्ता सन्मान निधी देण्यासाठी राज्य सरकारने 3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Ladki Bahin Yojana Jun Installment
महाराष्ट्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या “लाडकी बहीण” योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ₹३६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम 5 जुलै 2025 पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू; प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चेचे आश्वासन
अजित पवार यांनी सांगितले की, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात सादर होणाऱ्या प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चा व्हावी आणि कोणतेही विधेयक चर्चेविना मंजूर होऊ नये, अशी शासनाची भूमिका राहील. विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि सभागृहाचा एकही मिनिट वाया जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तीन आठवड्यांच्या या पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, त्या उद्या सभागृहात सादर केल्या जातील, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
चांगला पाऊस, पण नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
यंदा प्रथमच जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले. मात्र, काही ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
लाडकी बहीण योजना वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/