Mahahsscboard 12th HSC Result Declared बारावीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट डायरेक्ट लिंक

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahahsscboard 12th Hsc Result Declared फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) चा निकाल सोमवार, 5 मे 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सर्वात आधी निकाल www.mahahsscboard.in आणि mahresult.nic.in 2025 या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार असून, इतरही महत्वाच्या अधिकृत लिंकवर HSC Examination February 2025 Result पाहता येणार आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.

Mahahsscboard 12th Hsc Result Declared

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इ.12 वी (HSC) परीक्षेचा निकाल आज सोमवार, 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. या निकालाची अधिकृत घोषणा मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार करण्यात आली आहे.

HSC Examination February 2025 Result Direct Link.

महाराष्ट्र राज्याच्या बारावी निकालाच्या आधी म्हणजेच ५ मे रोजी सकाळी ११:०० वाजता शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये निकालाशी संबंधित महत्त्वाची माहिती, निकालाची टक्केवारी, जाहीर करण्यात आली आहे.

बारावीचा निकाल जाहीर: कोकण पुन्हा अव्वल, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

राज्यातील ९ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाने सर्वाधिक ९६.७४ टक्के निकालासह पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी – ८९.४६ टक्के लागला आहे.

यंदा १४ लाख २७ हजार ८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला

  • मुलींचा निकाल – ९४.५८%
  • मुलांचा निकाल – ८९.५१%
  • म्हणजेच, मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.०७ टक्के अधिक आहे.

विभागनिहाय निकाल (टक्केवारीत):

  • कोकण – 96.74%
  • कोल्हापूर – 93.64%
  • मुंबई – 92.93%
  • छत्रपती संभाजीनगर – 92.24%
  • अमरावती – 91.43%
  • पुणे – 91.32%
  • नाशिक – 91.31%
  • नागपूर – 90.52%
  • लातूर – 89.46%

दहावी बारावी परीक्षेचा निकाल प्रक्रियेत मोठा बदल! येथे पाहा

गुणपत्रिका कुठे मिळेल?

  • प्रत्येक विद्यार्थ्याचे विषयनिहाय गुण व तपशील या संकेतस्थळांवर उपलब्ध असतील.
  • विद्यार्थ्यांनी निकालाची प्रिंटआउट घेऊन ठेवावी.
  • DigiLocker App मध्येही डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध राहील.

महाविद्यालयांसाठी एकत्रित निकाल

  • कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल https://mahahsscboard.in (College Login) येथे मिळेल.

गुणपडताळणी, छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन कसे करायचे?

  1. गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज:
    • दिनांक: 6 मे 2025 ते 20 मे 2025
    • पद्धत: ऑनलाइन अर्ज mahahsscboard.in वरून
    • शुल्क भरणे: Debit Card / Credit Card / UPI / Net Banking द्वारे
  2. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज:
    • उत्तरपत्रिकेची छायाप्रती मिळाल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसांच्या आत अर्ज करावा.
    • अर्ज करण्यासाठी प्रथम छायाप्रती घेणे अनिवार्य आहे.

गुणसुधार (Class Improvement) योजना

  • जे विद्यार्थी सर्व विषयांतून उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना पुढील 3 संधी मिळतील:
    • जून-जुलै 2025
    • फेब्रुवारी-मार्च 2026
    • जून-जुलै 2026

पुरवणी परीक्षा 2025 बाबत महत्त्वाची माहिती

  • जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा श्रेणी सुधारू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी जून-जुलै 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल.
  • त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 मे 2025 पासून सुरू होणार आहे.
  • यासंबंधीचे अधिकृत परिपत्रक लवकरच जाहीर होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर 12 वी परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार आहे. बारावी निकाल पाहण्यासाठी हॉल तिकीट वरील सीट नंबर आणि आईचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे.

  1. खालील पैकी कोणतीही अधिकृत वेबसाईट वर जा.
  2. त्यानंतर HSC Result 2025 या लिंकवर क्लिक करा
  3. तुमचा Seat Number आणि आईचे नाव (Mother’s Name) टाका.
  4. Submit’ बटणावर क्लिक करा
  5. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल
  6. निकाल PDF स्वरूपात डाऊनलोड करून ठेवा व प्रिंट काढून घ्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून इतिहासातील सर्वात मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर येथे पाहा

maharashtra hsc result 2025 Declaration
maharashtra hsc result Declaration 2025
Mahahsscboard 12th Hsc Result Declared

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!