दहावी व बारावीच्या निकालासंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून मोठी घोषणा CBSE 10th and 12th Result Process Changed

Published On: May 4, 2025
Follow Us
Cbse 10th And 12th Result Process Changed

CBSE 10th and 12th Result Process Changed बोर्डाने दहावी व बारावीच्या निकालानंतरची प्रक्रिया बदलली आहे. यावर्षीपासून (2025 पासून) विद्यार्थ्यांना सर्वप्रथम त्यांच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स (Photocopy) मिळवावी लागणार आहे आणि त्यानंतरच ते मार्कांची पडताळणी (Verification of Marks) किंवा पुनर्मूल्यांकन (Re-evaluation) साठी अर्ज करू शकणार आहेत. याबाबतची नोटीस www.cbse.gov.in/cbsenew/cbse या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या.

CBSE 10th and 12th Result Process Changed संपूर्ण माहिती

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, या निकालाच्या आधीच सीबीएसई कडून एक महत्वाची नोटीस जारी करण्यात आली आहे. यंदा निकालाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सविस्तर पाहूया.

आधीचा नियम काय होता?

Cbse 10th And 12th Result Process Changed याआधी खालील क्रमाने प्रक्रिया होत होती:

  1. मार्कांची पडताळणी
  2. उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळवणे
  3. पुनर्मूल्यांकन

काय बदल झाला आहे?

CBSE च्या जुन्या प्रक्रियेमध्ये प्रथम विद्यार्थ्यांना मार्कांची पडताळणी करता येत होती. मात्र आता प्रक्रियेचा क्रम बदलण्यात आला आहे.

नवीन प्रक्रिया 2025 पासून खालील प्रमाणे असेल:

  1. तपासलेल्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळवणे
  2. मार्कांची पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन किंवा दोन्ही

हा बदल का करण्यात आला आहे?

CBSE ने सांगितले की, हा बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील फायदे होतील:

  • विद्यार्थी स्वतःची तपासलेली उत्तरपत्रिका पाहू शकतील.
  • कोणत्या प्रश्नांना किती मार्क्स मिळाले, कुठे काही त्रुटी आहेत का – हे समजेल.
  • उत्तरपत्रिका पाहिल्यानंतरच मार्कांची पडताळणी किंवा प्रश्नांचे पुनर्मूल्यांकन करता येईल.
  • त्यामुळे निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि योग्य असेल.

या प्रक्रियेचा फायदा कोणाला होईल? या नव्या प्रणालीचा फायदा मुख्यतः 2025 साली दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.

अधिकृत मार्गदर्शक सूचना कधी?

CBSE ने स्पष्ट केलं आहे की, निकाल जाहीर झाल्यावर 2025 च्या परीक्षेसाठी उत्तरपत्रिका मिळवणे आणि मार्क पडताळणीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

हा बदल दहावी व बारावीच्या सर्व CBSE विद्यार्थ्यांसाठी लागू असून, परीक्षा 2025 नंतर लागू करण्यात आलेला आहे.

अधिक माहितीसाठी:
CBSE ची अधिकृत वेबसाइट – www.cbse.gov.in

CBSE 10th and 12th Result Process Changed

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment