Maharashtra Budget 2025 LIVE: अजित पवार सादर करणार ११ वा अर्थसंकल्प: ठळक मुद्दे

By Marathi Alert

Updated on:

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी दिनांक १० मार्च रोजी वर्ष 2025-26 चा राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) विधानसभेत सादर केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून विशेष म्हणजे, अजित पवार यांचा अर्थमंत्री (Finance Minister Of Maharashtra Ajit Pawar) म्हणून हा ११ वा अर्थसंकल्प आहे.

आर्थिक शिस्तीवर भर देणारे अनुभवी प्रशासक

अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कट्टर पालन करणारे प्रशासक म्हणून ओळखले जातात. ते नेहमीच जनतेच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य देत असले, तरीही राज्याच्या आर्थिक स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची ते काळजी घेतात. पायाभूत सुविधा आणि विकास योजनांना भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोविड संकट काळातही त्यांनी महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटू दिली नाही. त्यांच्या या कार्याचा केंद्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर!

महाराष्ट्राचा ऐतिहासिक अर्थसंकल्प! ठळक मुद्दे पाहा

सर्वसामान्यांसाठी आशेचा अर्थसंकल्प Maharashtra State Budget 2025 26

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी आणि युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. याआधीही त्यांनी 2021 मध्ये जागतिक महिला दिनाच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करून तो महिलांना समर्पित केला होता.

2022 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी अर्थसंकल्प सादर करत तो त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेला अर्पण केला होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य आणि मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प त्यांनी मांडले आहेत.

महिलांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेत मोठी घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर २१०० रुपये मिळणार? येथे पाहा अपडेट

विक्रमाच्या दिशेने अजित पवार Finance Minister Of Maharashtra Ajit Pawar

आजचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (११) अर्थसंकल्प सादर करणारे दुसरे अर्थमंत्री ठरतील. ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर (१३ वेळा) सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दुसरे अर्थमंत्री ठरतील.

जयंत पाटील (१० वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (९ वेळा) यांनी यापूर्वी अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या नवीन योजना सादर केल्या जातील याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

Maharashtra Budget 2025 Live

Finance Minister Of Maharashtra Ajit Pawar Live Maharashtra Budget 2025

Maharashtra Budget 2025 Date And Time

State Budget 2025-26 Maharashtra Assembly

  • Date: 10 March 2025
  • Time: Monday at 2 pm

लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट! पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा!

विधानसभेत आतापर्यंत अर्थसंकल्प सादर केलेल्या मंत्र्यांची यादी Finance Minister Of Maharashtra List

Finance Minister Of Maharashtra List PDF Download

या ऐतिहासिक अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. काय असेल महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 (Maharashtra Budget 2025 26) मध्ये खास? जाणून घ्या लवकरच!

HSRP प्लेट: आता जुन्या वाहनांसाठी पण आवश्यक! नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल सादर Maharashtra Economic Survey 2024-25

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर केला ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25’ अहवालानुसार, राज्याची अर्थव्यवस्था 7.3% वाढण्याची अपेक्षा आहे, जी देशाच्या 6.5% वाढीच्या तुलनेत अधिक आहे. महाराष्ट्राने सर्वाधिक (13.5%) स्थूल राज्य उत्पन्नाचा वाटा कायम ठेवला असून, कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातही भरीव वाढ अपेक्षित आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!

राज्यातील कर आणि करेतर महसूल वाढत असताना भांडवली गुंतवणुकीवरही भर दिला जात आहे. राज्याचे बँकिंग आणि वित्त क्षेत्र भक्कम असून, स्टार्टअप्स आणि थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. तसेच, शेतकरी भरपाई योजना, आरोग्य योजना, पर्यटन, लॉजिस्टिक्स, वस्त्रोद्योग आणि निर्यात धोरणांद्वारे सर्वांगीण विकासाचे प्रयत्न सुरू आहेत.

या आर्थिक पाहणीमधून महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक वाढीचा आशादायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या स्थिर आणि समतोल आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत राहील.

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25’ हे प्रकाशन मराठी व इंग्रजी मध्ये खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!