MPSC Group C Clerk Result महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधील लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण ६५१९ उमेदवार निवडले गेले आहेत. मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हाकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.
MPSC Group C Clerk Result
या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील श्री. कटुळे तन्मय तानाजी (बैठक क्रमांक AU053165) यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
मागास वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यातील श्री. किसवे किशोर चंद्रकांत (बैठक क्रमांक PN068345) यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर महिला वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यातील श्रीमती गावडे दुर्गा विजयराव (बैठक क्रमांक PN071182) यांनी राज्यातून अव्वल स्थान पटकावले आहे.
गुणांची पडताळणी करण्याची संधी!
ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी आपले गुणपत्रक प्रोफाईलवर आल्याच्या १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, या संवर्गासाठी कोणतीही प्रतीक्षायादी (waiting list) कार्यान्वित केली जाणार नाही.
Advt.No. 111/2023 Maharashtra Group – C Services Main Examination 2023 – Clerk-Typist- Final Recommendation List
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ -लिपिक-टंकलेखक- अंतिम शिफारस यादी
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://mpsc.gov.in/