पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा; शिक्षण आयुक्तालयाचे आदेश जारी

Published On: March 1, 2026
Follow Us
PESA Teacher Bharti

PESA Teacher Bharti: महाराष्ट्र राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षण आयुक्तालय, पुणे यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एका अधिकृत पत्राद्वारे राज्यातील १३ जिल्ह्यांच्या (ज्यामध्ये अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगांव, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ यांचा समावेश आहे) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

PESA Teacher Bharti सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय

गेल्या काही काळापासून पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेमुळे स्थगिती देण्यात आली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला.

या निर्णयानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदभरतीस शासनाने मान्यता दिली आहे. याच शासन निर्णयाचा आधार घेत आता शालेय शिक्षण विभागानेही शिक्षक भरतीची प्रलंबित प्रक्रिया (PESA Bharti) तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

TET-2022 च्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना मिळणार नियुक्ती

शिक्षण आयुक्त PUNE यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2022) नुसार अनुसूचित जमाती (ST PESA) प्रवर्गातील जे उमेदवार गुणवत्ता यादीत संबंधित जिल्ह्यासाठी पात्र ठरले आहेत, त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना आरक्षण मर्यादेत तात्काळ नियुक्ती देण्यात यावी.

यामध्ये एक मोठा दिलासा असा आहे की, जे गुणवत्ताधारक उमेदवार अन्य जिल्ह्यात रुजू झाले असल्यामुळे आपल्या मूळ जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने हजर होऊ शकले नव्हते; परंतु आता त्यांना स्वतःच्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नियमित रुजू होण्याची इच्छा आहे, अशा उमेदवारांचाही या कायमस्वरूपी निवडीसाठी विचार करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

उर्वरित रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरणार

स्थानिक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि गुणवत्तेनुसार नियुक्ती दिल्यानंतरही जर जिल्ह्यात काही पदे रिक्त राहिली, तर ती उर्वरित सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्यासाठी प्रशासनाने पुढील आवश्यक कार्यवाही करावी, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी: पेसा शिक्षक भरती २०२६ अधिकृत परिपत्रक (PDF) डाउनलोड करा.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Pavitra Portal Teacher Recruitment

पवित्र पोर्टल 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू; या तारखेपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक

August 7, 2026
maharojgar melava 2026-27

राज्यात 1 हजार रोजगार मेळावे; युवकांना नोकरीसाठी दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण मिळणार

August 5, 2026
talathi bharti notification 2026

तलाठी पदांच्या 1539 जागांसह MPSC गट क पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध, डाउनलोड डायरेक्ट लिंक

August 3, 2026
public-exam-malpractice-bill-2026

लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2026 मंजूर; पेपरफुटी प्रकरणांत 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

August 2, 2026
NHM CHO Exam Date 2026

मोठी अपडेट! राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत CHO भरती परीक्षेची तारीख जाहीर

August 1, 2026
mpsc exam update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय! CBT परीक्षा पद्धती स्थगित; पूर्व परीक्षा OMR पद्धतीनेच होणार

July 23, 2026

Leave a Comment