नाशिक महानगरपालिका पदभरती जाहिरात प्रसिद्ध, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ!

Published On: November 29, 2025
Follow Us
Nashik mahanagarpalika bharti 2025

नोकरीच्या शोधात असलेल्या आणि अभियांत्रिकीची पदवी/पदविका धारण केलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! नाशिक महानगरपालिकेने (NMC) गट-क संवर्गातील विविध अभियांत्रिकी पदांसाठी सरळसेवा भरतीची जाहिरात (क्र. ०१/२०२५) प्रसिद्ध केली आहे. सविस्तर तपशील पाहूया.

नाशिक महानगरपालिका भरती 2025 | Nashik mahanagarpalika bharti 2025

Nashik mahanagarpalika bharti 2025

एकूण ११४ रिक्त पदे भरली जाणार असून , यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरतीमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामांना गती मिळणार असून, Nashik mahanagarpalika bharti 2025 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही मोठी संधी साधून लवकरात लवकर अर्ज करावेत.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया

नाशिक महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभागाने (दिनांक २९/१०/२०२५) रोजी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत आहे. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही तीच आहे.

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख: १० नोव्हेंबर २०२५

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ०१ डिसेंबर २०२५उमेदवारांनी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज फक्त नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.nmc.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, किंवा पदांच्या एकूण संख्येत बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी तथा आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांनी राखून ठेवला आहे.

या भरती संदर्भातील सविस्तर माहिती, वेतनश्रेणी (सातव्या वेतन आयोगानुसार), वयोमर्यादा, सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे तपशील, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना NMC च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीमधील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा.या संपूर्ण भरती जाहिरात खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करा.

मूळ जाहिरात पीडीएफ डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment