PUPPSS Msce Result पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल www.mscepune.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला आहे.
Table of Contents
PUPPSS Msce Result 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवार, दि. २५ एप्रिल, २०२५ रोजी www.mscepune.in व https://puppssmsce.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी २०२५ अंतरिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)
- PUPPSS Result चेक करण्यासाठी सर्वप्रथम https://2025.puppssmsce.in/ या वेबसाईट वर जा.
- त्यानंतर तिथे शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी २०२५ अंतरिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) यावर क्लिक करा
- आता Seat No टाकून सबमिट करा
- निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
शाळा लॉगइन School Login अंतरिम निकाल (शाळांसाठी)
- PUPPSS Result चेक करण्यासाठी सर्वप्रथम https://2025.puppssmsce.in/ या वेबसाईट वर जा.
- त्यानंतर तिथे शाळा लॉगइन School Login (अंतरिम निकाल (शाळांसाठी) यावर क्लिक करा
- आता UDISE Code आणि Password टाकून Login करा
- निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल

गुणपडताळणीसाठी 4 मे पर्यंत मुदत
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०४/०५/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०४/०५/२०२५ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.



