RTE Admission Maharashtra 2025 26 : नवीन शुल्क प्रतिपूर्ती दर जाहीर, ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची दुसरी यादी कधी? संपूर्ण माहिती

By Marathi Alert

Published on:

RTE Admission Maharashtra : बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act, 2009) अंतर्गत, राज्य शासनाने २५% राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शुल्क प्रतिपूर्ती दर जाहीर केला आहे. या निर्णयामुळे वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

या लेखामध्ये महाराष्ट्र आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025 26 च्या संदर्भातील संपूर्ण माहिती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE 25 टक्के प्रवेश नवीन प्रतिपूर्ती दर

RTE Act, 2009 नुसार कलम 12(1)(C) अंतर्गत खाजगी विनाअनुदानीत शाळांमध्ये २५% जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्याची तरतूद आहे.

कलम 12(2) नुसार शासनाने प्रत्येक वर्षी निश्चित केलेला शुल्क प्रतिपूर्ती दर आणि शाळांनी ठरवलेली फी यातील कमी असलेला दर लागू केला जातो.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नवीन शुल्क प्रतिपूर्ती दर (RTE Reimbursement New Rate) हा ₹17,670 प्रति विद्यार्थी निश्चित करण्यात आला आहे.

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती 

कोणत्या विद्यार्थ्यांना आणि शाळांना हा लाभ मिळेल?

  1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) व वंचित घटकांतील विद्यार्थी ज्यांनी RTE 25% कोट्यातून प्रवेश घेतला आहे.
  2. RTE कायद्याअंतर्गत मान्यता प्राप्त 25 टक्के प्रवेश दिलेल्या खाजगी विनाअनुदानीत शाळा.
  3. ज्या शाळांनी RTE पोर्टलवर प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत केली आहे.
  4. ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण आहे आणि शाळेतील उपस्थिती निश्चित आहे.

आरटीई 25 टक्के अंतर्गत (RTE Admission Maharashtra) मोफत प्रवेश मिळालेल्या मुलांची शैक्षणिक फी ही राज्य शासन शाळांना प्रतिपूर्ती म्हणून देण्यात येते. त्यानुसार आता 17,670 प्रति विद्यार्थी याप्रमाणे शैक्षणिक फी संबंधित शाळांना देण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय खाली दिलेल्या अधिकृत डायरेक्ट लिंक वर पाहा.

अधिक माहितीसाठी : आरटीई 25 टक्के प्रवेश अंतर्गत नवीन शुल्क प्रतिपूर्ती दर शासन निर्णय वाचा.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2025 26 । RTE Admission Maharashtra

RTE Admission Maharashtra : पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया ही डिसेंबर महिन्यामध्ये सुरू करण्यात आली होती. पहिला टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शाळांना आरटीई 25% प्रवेशासाठी RTE च्या जागा निश्चित करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

RTE Lottery Result 2025-26

त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये प्रत्यक्ष पालकांना RTE Admission प्रवेशासाठी Application अर्ज करण्यासाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली, त्यानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन पद्धतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 लॉटरी (RTE Lottery Result date 2025-26) काढण्यात आली.

शैक्षणिक वर्ष 2025 26 या वर्षातील आरटीई (RTE Lottery Result List 2025-26) ची पहिली लॉटरी ची यादी जाहीर केल्यानंतर आता पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे.

RTE 25 टक्के राखीव जागांसाठी 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांची निवड

महाराष्ट्र राज्यातून RTE 25 टक्के राखीव जागांसाठी 3 लाख 5 हजार 152 ऑनलाईन अर्ज आले होते. त्यानुसार (RTE Maharashtra Result) मध्ये प्रत्यक्ष 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर 85 हजार 457 विद्यार्थी हे प्रतीक्षा यादीत आहे.

RTE 25% Dashboard for Academic Year : 2025-2026

Number of ApplicationNumber of SelectionsWaiting
Selections
Admitted in 1st Regular Selection List (Up To 21 Feb 2025)
3051521019678545711522

RTE Admission 2025-26 Maharashtra Last Date

आरटीई लॉटरी मध्ये (RTE 1st Regular Selection List) नुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे.

RTE Allotment Letter Download 2025-26

‘आरटीई’ अंतर्गत निवड झालेल्या मुलांचे प्रवेशपत्र (Admit Card) त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जाचे लॉगिन करून RTE Allotment Letter Download करता येते. यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. आणि तुमचे लॉगिन डिटेल्स टाकून RTE Allotment Letter Download करून घ्या.

आरटीई’ प्रवेश लॉटरी निवड यादी निकाल येथे पाहा

RTE Admission Application Status

RTE Admission Application Status 2025 26 चेक करण्यासाठी आरटीई च्या अधिकृत या www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Application Wise Details अर्जाची स्थिती टॅब मध्ये Application No टाका आणि Go बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल. अधिक माहिती जाणून घ्या

‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची दुसरी यादी कधी? RTE Result Second Round Date

RTR 25% प्रवेशाची दुसरी यादी ही पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर म्हणजेच दिनांक 28 फेब्रुवारी 2025 नंतर RTE Result Second Round सुरू होईल, तेव्हा लॉटरीची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. या दुसऱ्या यादीमध्ये वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आरटीई दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

अधिक माहितीसाठी : RTE पोर्टल https://student.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

सारांश

अशा प्रकारे आपण या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र राज्यातील RTE Admission Maharashtra 2025 26 च्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात महत्वाची माहिती जाणून घेतली. त्यामध्ये राज्य शासनाने जाहीर केलेले नवीन शुल्क प्रतिपूर्ती दर, RTE Admission 2025 26 प्रवेश प्रक्रिया, RTE Result 2025 Maharashtra Lottery List, RTE Result Second Round Date याबाबत संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. त्यामुळे या माहितीचा आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत असणाऱ्या पालकांना याची नक्कीच मदत होईल. अशाच नवनवीन अपडेट साठी ‘मराठी अलर्ट’ (Marathi Alert) या वेबसाईट ला Follow करा.

अंगणवाडी मदतनीस आणि सेविका भरती – रिक्त पदांचा तपशील

Leave a Comment

error: Content is protected !!