School Summer Holidays 2026: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत महत्वाचे परिपत्रक शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २८ मार्च २०२६ रोजी निर्गमित केले आहे.
राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर
शासन परिपत्रक दि. २० एप्रिल २०२३ नुसार यापूर्वी शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे.
१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवार दि.०२ मे, २०२६ पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२) राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
३) पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ मध्य विदर्भ तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ रोजी सुरू करण्यात याव्यात.
४) जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि. १५ जून, २०२६ ते २९ जून, २०२६ पर्यंत सकाळ सत्रात ७.०० ते ११.४५ या वेळेत सुरू करण्यात याव्यात. मंगळवार दि. ३०/०६/२०२६ पासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात.
वरील सूचना राज्यातील सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे आदेश देण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी: राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा










