Teacher Increase Salary तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ – 1 मे 2025 पासून नवीन दर

Published On: April 30, 2025
Follow Us
Teacher Increase Salary

Teacher Increase Salary राज्यातील अनेक अशासकीय (खाजगी) मान्यताप्राप्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये काही विषयांसाठी पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध नसतात. अशावेळी त्या विषयांसाठी अर्हताप्राप्त शिक्षकांना “घड्याळी तासिका तत्त्वावर” म्हणजेच एका तासाच्या कामासाठी मानधन देऊन नेमले जाते.

Teacher Increase Salary शासनाने काय निर्णय घेतला?

राज्य सरकारने 1 मे 2025 पासून घड्याळी तासिका तत्त्वावर नेमल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खाली नवीन दर दिले आहेत:

शाळेचा प्रकारजुने मानधन (प्रति तास)नवीन मानधन (प्रति तास)
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय₹150₹300
माध्यमिक शाळा₹120₹250
  • घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त होणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असणे आवश्यक आहे.
  • अर्हता नसलेल्या व्यक्तीची अशा पदासाठी नेमणूक केली जाऊ नये.
  • शिक्षकांना मानधन नियमितपणे दिले जावे, यासाठी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

हा निर्णय राज्यातील अनेक शिक्षकांसाठी दिलासादायक आहे. शिक्षकांना अधिक योग्य मोबदला मिळेल व शिक्षणाची गुणवत्ता देखील सुधारेल.

मानधन वाढीचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment