WCD Dhule Anganwadi Bharti 2025 महिलांसाठी सुवर्णसंधी! महिला व बाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी 2025 ची भरती जाहीर झाली आहे. या भरतीत एकूण 21 पदे रिक्त असून, किमान १२वी उत्तीर्ण महिलांना अर्ज करण्याची संधी आहे. अर्जाची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 असून अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. वाचा सविस्तर पात्रता, अटी, कागदपत्रांची यादी, Anganwadi Madatnis Payment आणि अर्ज प्रक्रिया.
Table of Contents
अंगणवाडी भरती 2025 – सविस्तर माहिती | WCD Dhule Anganwadi Bharti 2025
- भरती कार्यालय: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महिला व बाल विकास विभाग, धुळे
- एकूण रिक्त पदे: 21
शैक्षणिक पात्रता
- किमान १२वी उत्तीर्ण (राज्य मंडळ किंवा समकक्ष परीक्षा).
स्थानिक रहिवासी अट
- अर्ज करणारी महिला त्या शहराची रहिवाशी असावी.
- अधिकृत रहिवाशी दाखला लागेल.
वयोमर्यादा
- 18 ते 35 वर्षे.
- विधवा महिलांसाठी कमाल वय 40 वर्षे.
- वयाचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला/जन्म प्रमाणपत्र इ.
लहान कुटुंब अट
- उमेदवाराच्या फक्त दोनच हयात अपत्ये असावीत.
- यासाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आवश्यक.
मराठी भाषेचे ज्ञान
- मराठी विषयासह किमान एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
विशेष बाबींसाठी आवश्यक कागदपत्रे
- विधवा – पतीचा मृत्यू दाखला आणि विधवा प्रमाणपत्र.
- अनाथ – संबंधित प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
- मागासवर्गीय उमेदवार – जातीचा दाखला.
- अनुभव – किमान 2 वर्षांचा सरकारी अंगणवाडीचा अनुभव (खाजगी अनुभव ग्राह्य नाही).
इतर अटी
- फक्त एक अर्ज सादर करावा.
- अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय अर्ज अपात्र ठरेल.
- अर्ज 22 एप्रिल 2025 पूर्वी प्रत्यक्ष कार्यालयात सादर करावा.
- निवड गुणांनुसार गुणवत्ता यादीवरून केली जाईल. परीक्षा/मुलाखत नाही.
- निवड झाल्यावर इतर केंद्रावर बदली शक्य नाही. प्रवास भत्ता मिळणार नाही.
- मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक.
- नियुक्ती मानधनावर आधारित आहे, भत्ते मिळणार नाहीत.
- सेवा वयोमर्यादा: 60 वर्षे किंवा शारीरिक असमर्थतेपर्यंत.
- नियुक्तीमधून निर्माण होणाऱ्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
नोट: रिक्त पदांचा तपशील व केंद्रानुसार जागा सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF पाहावी.
Anganwadi Madatnis Payment
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यात येते.
- अंगणवाडी सेविका – 10 हजार रुपये
- मिनी अंगणवाडी सेविका – 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिस (Anganwadi Madatnis Payment) – 5525 रुपये
अर्जाची प्रक्रिया
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
- अर्जाचे नमुने संबंधित प्रकल्प कार्यालयातून किंवा अधिकृत वेबसाईटवरून मिळतील.
- भरलेला अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
जाहिरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून 10 दिवस
➡️ 15 एप्रिल 2025
अंगणवाडी भरती जाहिरात
अधिक माहितीसाठी: अंगणवाडी मदतनीस पदभरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
अधिकृत वेबसाईट: https://dhule.gov.in/
Aanganvadi sevika bharti