YCMOU Bed Admission 2025-27 सेवांतर्गत शिक्षकांसाठी बी.एड. शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YCMOU Bed Admission 2025-27 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे (YCMOU) २०२५-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम २०२५ – २७ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हा शिक्षणक्रम सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी विशेषतः तयार करण्यात आला आहे.

YCMOU Bed Admission 2025-27 संपूर्ण माहिती

शिक्षणक्रमाविषयी महत्त्वाचे तपशील:

कालावधी: या शिक्षणक्रमाचा कालावधी किमान दोन वर्षांचा असून, तो जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत पूर्ण करता येईल.

श्रेयांक: हा शिक्षणक्रम ८० श्रेयांकांचा आहे, ज्यामध्ये सुमारे २४०० अध्ययन तासांचा समावेश आहे. (एक श्रेयांक म्हणजे ३० ते ३५ तासांचा अभ्यास ).

माध्यम: बी.एड. शिक्षणक्रमाचे माध्यम मराठी आहे. स्वयं-अध्ययन साहित्यही मराठीत उपलब्ध आहे.

प्रवेश पात्रता:

  • यू.जी.सी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना पदवी/पदव्युत्तर परीक्षेत किमान ५०% गुण (४९.५% ते ५०% पर्यंत) आणि मागासवर्गीय अर्जदारांना किमान ४५% गुण (४४.५% ते ४५% पर्यंत) असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर श्रेणी लागू केली आहे, त्यांना गुणांची अट नाही, फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • डी.एड./डी.टी.एड. पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर पूर्णवेळ/अर्धवेळ काम करणारे व किमान 2 वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्षे) अनुभव असलेले शिक्षक पात्र असतील.

प्रवेश अपात्रता: खालील प्रकारचे अर्ज अपात्र ठरवले जातील:

  • ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्तीचा उल्लेख नाही.
  • सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून अर्ज भरणारे.
  • अपूर्ण आणि खोटी माहिती असलेले अर्ज.
  • सध्या सेवेत नसलेले शिक्षक.
  • तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक.
  • यू.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक.
  • पदवीच्या अंतिम परीक्षेला बसलेले, परंतु निकाल न लागल्याने पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक.
  • बालवाडीत शिकवणारे शिक्षक.

जागा आणि आरक्षण:

  • एन.सी.टी.ई. ने बी.एड. शिक्षणक्रमाला एकूण १५०० जागांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ४१/४२ जागा भरण्यात येतात.
  • महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी ५०% जागा आरक्षित आहेत.
  • दिव्यांगांसाठी ५% म्हणजेच एकूण ७५ जागा आरक्षित असतील. प्रत्येक जिल्ह्याला किमान २ किंवा कमाल ३ जागा दिल्या जातील. दिव्यांगांच्या प्रवेशासाठी UDID (Unique Disability Identity Card) प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  • महिला अर्जदारांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या ३०% जागा राखीव आहेत.
  • सैनिक (आजी/माजी कर्मचारी/पत्नी/मुलगा/अविवाहित मुलगी) यांच्यासाठी २% जागा राखीव आहेत. प्रत्येक जिल्ह्याला किमान एक जागा दिली जाईल.
  • स्वतंत्र सैनिक पती/पत्नी, मुलगा/अविवाहित मुलगी, भूकंप व प्रकल्पग्रस्त आणि विधवा व परितक्ता या संवर्गासाठी अतिरिक्त २ गुण दिले जातील.
  • अनाथांसाठी १% समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी महत्त्वाच्या सूचना:

  • अर्जदारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून माहितीपुस्तिका डाउनलोड करावी आणि ऑनलाईन अर्ज भरावा.
  • अर्ज भरताना माहितीची अचूकता तपासणे बंधनकारक आहे. एकदा ‘Submit’ बटण दाबल्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही.
  • अर्जात दुरुस्तीसाठी शेवटच्या मुदतीनंतर स्वयं-संपादनाची संधी दिली जाईल.
  • सेवा अनुभव ३० एप्रिल २०२५ पर्यंतचा ग्राह्य धरला जाईल. यानंतरचा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.
  • ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीच्या मूळ पुराव्यांची पडताळणीवेळी सादर करणे अनिवार्य आहे. मूळ कागदपत्रे नसल्यास माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.
  • अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र पडताळणीनंतर प्रवेश अर्ज आपोआप लॉक होईल.
  • अर्जदारांनी आपल्या शाळेच्या जिल्ह्यांतूनच अर्ज भरणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज बाद होईल.
  • प्रवेशासंदर्भातील सर्व सूचना ‘http://ycmou.digitaluniversity.ac‘ या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार होईल. इतर कोणताही मार्ग कोणी सूचित केल्यास, मा. कुलसचिव यांच्याकडे लेखी तक्रार करावी.

ycmou bed admission last date

महत्वाच्या लिंक

YCMOU Bed Admission 2025-27

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!