आरोग्य विभागात २,००० पदनिर्मिती करण्यास राज्य सरकारची मंजूरी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू Govt Approval Health Department New Posts

Published On: February 19, 2025
Follow Us
Govt approval health department new posts

Govt Approval Health Department New Posts : राज्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांना बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत २,०७० नवीन पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या अंतर्गत २,०७० नवीन पदनिर्मितीसाठी मान्यता

दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, नव्याने स्थापन करण्यात आलेली तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्रे यासाठी आवश्यक असणाऱ्या पदांचे आकृतीबंध निश्चित करण्यात आले आहेत.

या शासन निर्णयानुसार राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.

यामध्ये ८६ आरोग्य संस्थांसाठी ८३७ नियमित पदे आणि १,२३३ कुशल/अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन

राज्यातील या आरोग्य संस्थांचा समावेश

  • ४७ उपकेंद्रे
  • १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे
  • ५ ग्रामीण रुग्णालये
  • २ ट्रॉमा केअर युनिट
  • ४ स्त्री रुग्णालये
  • १० उपजिल्हा रुग्णालये
  • २ जिल्हा रुग्णालये

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!

वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्याने रिक्त पदे (Govt Approval Health Department New Posts) भरण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच, यापूर्वी प्रतीक्षा यादीत असलेल्या ४०८ एमबीबीएस गट अ आणि २५ बीएएमएस गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सूचित केले आहे.

महत्वाची अपडेट! DA, OPS, बालसंगोपन रजा, कंत्राटी पद्धतीऐवजी नियमित कर्मचारी भरती – सविस्तर जाणून घ्या

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

अधिक माहितीसाठी : आरोग्य विभागाच्या २,०७० नवीन पदनिर्मितीस मान्यता, बाबतचा शासन निर्णय पाहा

अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

आरोग्य विभाग अधिकृत वेबसाईट : https://phd.maharashtra.gov.in/

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

NHM SSA Contract Employees Regularization Latest Update

NHM आणि SSA मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन; सोमवारी होणार निर्णायक बैठक?

June 20, 2026
Regularization Daily Wages Employees

रोजंदारी व तासिका कर्मचाऱ्यांना येणार अछे दिन! लवकरच शासन सेवेत सामावून समायोजन होणार, महत्वाची बैठक संपन्न

June 17, 2026
contract teacher

कंत्राटी शिक्षकांना मोठा दिलासा! या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार, शासन निर्णय डाउनलोड करा

May 28, 2026
samagra-shiksha-abhiyan-maharashtra-future-plan-guidelines-2026

‘समग्र शिक्षा’ योजनेच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

April 5, 2026
NHM Contractual Employees Services

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर

March 23, 2026
Contractual Health Workers Regularization

राज्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेणार का? सरकारकडून मोठा खुलासा!

March 23, 2026

Leave a Comment