लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू; ‘ही’ चूक सुधारा आणि मिळवा हक्काचे ४५०० रुपये!

Published On: February 8, 2026
Follow Us
Ladki Bahin Maharashtra Government in e-kyc Link Online

Ladki Bahin Maharashtra Government in e-kyc Link Online: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात पात्र लाभार्थी महिलांच्या ई केवायसी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अनेक महिलांनी अर्ज भरताना किंवा e-KYC करताना नकळत काही चुका केल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता शासनाने या चुका सुधारण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे.

याविषयीचा शासन निर्णय (GR) महिला व बाल विकास विभागाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित केला आहे. नेमकं काय म्हटलंय या आदेशात? आणि ही दुरुस्ती कोणाला करता येणार? चला सविस्तर जाणून घेऊया.

लाडक्या बहि‍ण योजना ई-केवायसी चूक सुधारण्याची संधी!

Ladki Bahin योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी Aadhaar Authentication द्वारे आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करत असताना एका विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देताना अनेक महिलांकडून नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला.

तो प्रश्न होता: “लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे?“.

सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का? या प्रश्नावर अनेक महिलांनी गडबडीत किंवा न समजल्यामुळे चुकीचा पर्याय निवडला. यामुळे पात्र असूनही अनेक महिला लाभापासून वंचित राहण्याची किंवा पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.

लाडकी बहीण योजना : e-KYC अंतिम मुदत वाढली! या अधिकृत वेबसाईटवर लगेच e-KYC करा

शासनाचा मोठा निर्णय: दुरुस्तीसाठी मिळाली मुदतवाढ

लाभार्थी महिला आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून वारंवार येणाऱ्या मागण्यांचा विचार करून, शासनाने लाडकी बहीण योजना ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्ही जर अद्याप (Ladki Bahin Maharashtra Government in e-kyc Link Online) शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप कामाची आहे. ज्या महिलांनी e-KYC करताना वरील पर्यायात चूक केली आहे, फक्त अशाच महिलांसाठी ही दुरुस्तीची संधी उपलब्ध असणार आहे.

दुरुस्ती करण्यासाठी अंतिम तारीख काय?

शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार, अशा लाभार्थी महिलांना आपल्या e-KYC अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्या आहेत, त्यांनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजना ई केवायसी लिंक वर जाऊन किंवा संबंधित पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलांना e-KYC मधून सूट; शिफारस नमूना पत्र डाउनलोड करा

ही शेवटची संधी असणार!

या संधीचा लाभ घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण शासनाने स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही. त्यामुळे (Ladki Bahin Maharashtra Government in e-kyc Link Online) चा वापर करून ३१ मार्च २०२६ च्या आत आपली माहिती अचूक भरा.

ई केवायसी पूर्ण करा आणि मिळवा हक्काचे ४५०० रुपये!

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही महिलेने अर्जात ही चूक केली असेल, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अचूक माहिती भरल्यासच योजनेचा लाभ विना अडथळा मिळेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी (Ladki Bahin Maharashtra Government in e-kyc Link Online) या अधिकृत प्रक्रियेचा वापर करा. ई केवायसी पूर्ण करणाऱ्या पात्र लाभार्थी महिलांना जर डिसेंबर, जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित ४५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी : ई केवायसी संदर्भात नवीन शासन निर्णय डाउनलोड करा

लाडकी बहीण योजना: ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत? लगेच ‘या’ यादीत नाव चेक करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment