अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय डाउनलोड करा

Published On: April 8, 2026
Follow Us
Anganwadi Sevika Salary

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२६ चे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय ७ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनासाठी एकूण १७४.०० कोटी रुपयांचा अतिरिक्त राज्य हिश्याचा निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी विशेषतः माहे मार्च २०२६ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वेळेवर मिळावा या उद्देशाने आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना सुपूर्द करण्यात आला आहे.

सदर खर्च हा ‘२२३६-पोषण आहार’ या प्रधान लेखाशीर्षांतर्गत असलेल्या ‘अंगणवाडी सेवा (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%)’ या तरतुदीमधून भागविण्यात येणार आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना वित्त विभागाच्या सूचनांचे पालन करून सदर निधीचा विहित पद्धतीने विनियोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, मार्च महिन्याचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक माहितीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय डाउनलोड करा

शासन निर्णय

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026
asha-workers-online-data-entry-clarification

आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन कामाबाबत विधानसभेत महत्वाचे स्पष्टीकरण

July 8, 2026
anganwadi-sevika-promotion-age-limit-gr

अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय! मुख्यसेविका पदोन्नतीसाठी वयोमर्यादेत बदल; नवीन शासन निर्णय जारी

July 3, 2026
panvel-viral-video-truth-anganwadi-sevika

त्या व्हायरल व्हिडिओ मधील अंगणवाडी सेविकांबाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा खुलासा

June 27, 2026

Leave a Comment