महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच १२ वीचा निकाल (HSC Result 2026) ऑनलाईन पद्धतीने २ मे २०२६ रोजी जाहीर केला आहे. Result लागल्यापासून सर्व विद्यार्थी आणि पालक त्यांच्या मूळ गुणपत्रकाची म्हणजेच (HSC Result Marksheet) ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपली असून, राज्य मंडळाने एक अधिकृत प्रकटन जाहीर करून मूळ गुणपत्रक वाटपाची तारीख आणि वेळ निश्चित केली आहे.
MahaHsscBoard मंडळाने जाहीर केलेल्या प्रकटनानुसार, फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे मूळ गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्र वाटप सोमवारी, दिनांक २५ मे २०२६ रोजी केले जाणार आहे. सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांना सकाळी ११.०० वाजता विभागीय मंडळांकडून हे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
त्यानंतर, त्याच दिवशी म्हणजेच २५ मे रोजी दुपारी ३.०० वाजता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना त्यांचे (HSC Result Marksheet) प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना वेळेवर गुणपत्रके द्यावीत, असे निर्देश मंडळाने दिले आहेत.
NTA NEET 2026 Fee Refund Process Official Direct link Step by Step Guide
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा सर्व नऊ विभागीय मंडळांसाठी ही एकच वेळ आणि तारीख लागू असणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विद्यार्थी, प्राचार्य आणि पालकांनी या वेळेची नोंद घेणे आवश्यक आहे.
दहावी-बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन; 1 मे पासून नवीन नियम लागू; डायरेक्ट लिंक
सोमवारी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून आपले मूळ गुणपत्रक प्राप्त करून घ्यावे. पदवीच्या किंवा पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हे (HSC Result Marksheet) अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असते, त्यामुळे ते वेळेवर मिळवणे आणि सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांच्या स्वाक्षरीने २१ मे २०२६ रोजी हे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे.
| राज्य मंडळाचे अधिकृत प्रकटन | येथे डाउनलोड करा |
| महाराष्ट्र बोर्ड अधिकृत वेबसाईट | www.mahahsscboard.in/ |

Read More
MHT CET PCM Answer Key Objection Tracking Result 2026 Public Notice
MHT CET 2026: PCB ग्रुपच्या उत्तर तालिकेत मोठा बदल! तुमचे मार्क्स वाढणार का? लगेच तपासा







