अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, 5 लाख 74 हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट; ‘या’ तारखेच्या आत करा प्रवेश निश्चित

Published On: May 29, 2026
Follow Us
FYJC Admission 1st Merit List

FYJC Admission 1st Merit List PDF Live : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयामार्फत (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी (Round 1 Cut-off Merit List) २९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आतापर्यंत तब्बल १२,५१,२५९ विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली होती, ज्यापैकी पहिल्या फेरीत ५,७४,९४३ विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट करण्यात आली आहेत.

Revised fyjc Admission Schedule for Round 1

Revised fyjc Admission Schedule for Round 1

विद्यार्थ्यांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता, अधिकृत वेबसाईटवर स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ‘कॅप अलॉटमेंट स्टेटस‘ तपासावे आणि आपल्याला कोणते कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे याची खात्री करावी.

FYJC Admission 1st Merit List Status

मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा असल्यास, विद्यार्थ्यांनी लॉगीन मधून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन‘ या पर्यायावर क्लिक करून आपली सहमती दर्शवावी. त्यानंतर संबंधित महाविद्यालयात विहित कालावधीत प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. इन-हाऊस, अल्पसंख्याक आणि केंद्रीय कोट्यासाठी प्रवेश निश्चित करण्याचा हा कालावधी २९ मे ते ३ जून २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमातील १ ते १० पैकी कोणतेही महाविद्यालय मिळाले असेल आणि तिथे त्यांना प्रवेश हवा असेल, तर त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा; अन्यथा पुढील फेरीच्या सूचना संकेतस्थळावर दिल्या जातील.

पहिल्या यादीत तुमचं नाव नसेल तर पुढे काय?

तसेच ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या (FYJC Admission 1st Merit List) यादीत महाविद्यालय मिळालेले नाही, त्यांनी निराश न होता दहावीचे गुण व महाविद्यालयांचे कट-ऑफ लक्षात घेऊन दुसऱ्या फेरीसाठी प्रवेश अर्जाचा भाग-२ मध्ये वेळापत्रकाप्रमाणे पसंतीक्रम नव्याने भरून लॉक करावेत. विशेष बाब म्हणजे, कोणत्याही कोट्यातून (केंद्रीय, अल्पसंख्याक, इन-हाऊस किंवा व्यवस्थापन) एकदा प्रवेश निश्चित केल्यावर विद्यार्थ्याला पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केले जाईल.

ज्या विद्यार्थ्यांनी इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यासोबतच केंद्रीय कोट्यासाठीही अर्ज लॉक केला आहे, अशा विद्यार्थ्यांना दोन्ही गुणवत्ता यादींमध्ये महाविद्यालये अलॉट होऊ शकतात. अशा वेळी कोणत्या महाविद्यालयात आणि कोणत्या कोट्यातून प्रवेश निश्चित करायचा, हा सर्वस्वी निर्णय संबंधित विद्यार्थी व पालकांचा असेल.

विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती, तर राज्य मंडळाचे विद्यार्थी आघाडीवर

FYJC Admission 1st Merit List Stream wise

पहिल्या फेरीत अलॉट झालेल्या एकूण ५,७४,९४३ विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेची सर्वाधिक पसंती दिसून येत असून, तब्बल ३,२३,४३१ विद्यार्थ्यांना विज्ञान शाखा मिळाली आहे. त्याखालोखाल १,२६,०९० विद्यार्थ्यांना वाणिज्य, तर १,२५,४२२ विद्यार्थ्यांना कला शाखा मिळाली आहे. शैक्षणिक मंडळनिहाय आकडेवारी पाहिल्यास, यात राज्य मंडळाचे सर्वाधिक ५,२६,१६१ विद्यार्थी आहेत. याव्यतिरिक्त सीबीएसईचे ३५,९७१, आयसीएसईचे १०,१०१ आणि उर्वरित विद्यार्थी इतर मंडळांचे (आयबी, आयजीसीएसई, एनआयओएस इ.) आहेत.

मुंबई व पुणे विभागात सर्वाधिक प्रवेश; मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक

FYJC Admission 1st Merit List Circule wise

विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबई विभागात सर्वाधिक १,३३,३२३ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली असून, त्यापाठोपाठ पुणे विभागात १,०९,६२२ प्रवेश अलॉट झाले आहेत. नाशिकमध्ये ६५,०६४, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ६४,८६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अमरावती (५८,६८६), नागपूर (५४,९३७), कोल्हापूर (५४,७७०) आणि लातूर (३३,६७४) असा इतर विभागांचा क्रम लागतो. विशेष म्हणजे, अलॉट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये २,९८,१३७ मुली असून, मुलांची संख्या २,७६,८०६ आहे, ज्यामुळे यंदा मुलींनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट होते.

अधिक माहितीसाठी व मदतीसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. तसेच प्रवेशासंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्यास support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर किंवा ८५३०९५५५६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

FYJC Admission 1st Merit ListPDF Download Click Here
Allotment ListClick Here
Stream Wise CollegesClick Here
FYJC Admission Official Websitehttps://mahafyjcadmissions.in/
FYJC Admission Loginhttps://mahafyjcadmissions.in/login

महत्वाच्या सूचना

  1. राज्य मंडळाने अद्याप मूळ गुणपत्रिका वाटप केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करतेवेळी गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला कनिष्ठ महाविद्यालयांकडून अनिवार्य करण्यात येऊ नये. गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यानंतर सादर करण्यात येईल असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून घ्यावे.गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखलासादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला जाईल याबाबत जाणीव करून देण्यात यावी.
  2. वाटप प्रक्रिया (ऑलॉटमेंट प्रोसेस) कॅप फेरी १ साठी २९ मे ला सकाळी ११:०० वाजता प्रदर्शित केली जाईल.कॅप आणि कोटा फेरी १ साठीची प्रवेश प्रक्रिया २९ मे २०२६ रोजी सकाळी १२:०० वाजल्यापासून ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.

FYJC Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment