पुढील पाच दिवस राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट; काही जिल्ह्यांना ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Published On: August 1, 2026
Follow Us
pavsacha andaaz 2026

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, नाशिक घाट परिसर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२ ऑगस्ट २०२६ रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

३ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

४ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

५ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

मागील आठवड्यातील अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेगही वाढू शकतो. मात्र, दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे तसेच काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरड कोसळण्याचाही धोका असल्याने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

२९ जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भ, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. ३० जुलै रोजी हा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक तीव्र राहू शकतो. तर ३१ जुलै रोजी खानदेशातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातही ३० व ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ३० जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता अधिक आहे.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भागात राहणारे नागरिक, नदी-नाल्यांच्या परिसरातील रहिवासी तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई वेधशाळेने हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

राज्यात पुढील तीन दिवस अनेक भागांत मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२८ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, जळगाव, पुणे घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२९ जुलै २०२६ रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच नाशिक, नाशिक घाट परिसर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग येथे यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

३० जुलै २०२६ रोजी रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, झाडाखाली उभे राहणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

pavsacha andaj 28 july to 31 july
PAVSACHA ANDAJ 17 JULY TO 21 JULY 2026

१७ जुलै रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जना व विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

१९ जुलै रोजी अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या व आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://mausam.imd.gov.in/mumbai/

मागील दिवसांचा पाऊस अंदाज

विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरघाट,अहिल्यानगर, धुलेजळगाव, वाशीम आणि वर्धा, नागपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, सातारा घाट आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे यलो अलर्ट राहणार असून, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल.

९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. ११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेने नागरिकांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

pavsacha andaj

संपूर्ण पावसाचा जिल्हा निहाय अंदाज IMD अहवाल pdf डाउनलोड करा

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची, शहरांतील रस्ते जलमय होण्याची तसेच घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांची आणि वाहतुकीची अद्ययावत माहिती घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

अरबी समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी आणि पशुपालकांसाठी महत्त्वाचा सल्ला

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भातशेती आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमध्ये साचलेले अतिरिक्त पाणी तातडीने बाहेर काढण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. तसेच जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन पशुपालकांना करण्यात आले आहे.

हवामान पाऊस अंदाज IMD PDF डाउनलोड

pavsacha andaaz imd 2026

संपूर्ण पावसाचा अंदाज IMD अहवाल pdf डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment