मतदार नोंदणी अधिकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक मानधन देण्यास मंजूरी, शासन निर्णय जारी

Published On: August 7, 2026
Follow Us
ERO AERO Annual Honorarium

राज्यातील मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer – ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (Assistant Electoral Registration Officer – AERO) यांना वार्षिक मानधन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने 6 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

शासन निर्णयानुसार, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना दरवर्षी 30,000 रुपये, तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांना 25,000 रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन 1 जुलै 2026 पासून लागू करण्यात आले आहे.

राज्यातील मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत ठेवण्यामध्ये ERO आणि AERO यांची महत्त्वाची भूमिका असते. मतदार यादी तयार करणे, तिचे पुनरावलोकन करणे तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध जबाबदाऱ्या हे अधिकारी पार पाडतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारत निवडणूक आयोगाने मानधन देण्याचा निर्णय घेतला असून, राज्य शासनाने त्याला मान्यता दिली आहे.

सध्या महाराष्ट्रात 288 मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि 1,762 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) नियमितपणे कार्यरत आहेत. याशिवाय, राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पडताळणी (SIR-2026) कार्यक्रमासाठी भारत निवडणूक आयोगाने 3,527 अतिरिक्त AERO पदे अधिसूचित केली आहेत. या अतिरिक्त पदांवर नियुक्त अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कार्यकाळात हे मानधन मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार, या मानधनावरील खर्च मतदार याद्या तयार करणे व मुद्रण यासाठीच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात येणार आहे. तसेच हा निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेनंतर जारी करण्यात आला असून, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Anukampa Niyukati Prastav

अनुकंपा नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 14, 2026
retirement-after-government-residence-child-education-maharashtra-gr

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! पाल्याच्या शिक्षणासाठी शासनाने दिली मोठी सवलत

August 14, 2026
aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
arogya-vibhag-badli-new-policy-gr-2026

आरोग्य विभाग बदली धोरणात मोठा बदल! गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना आता विनंती बदलीसाठी नवीन तरतूद

August 11, 2026
arogya vibhag employee latest update

NHM कर्मचारी समायोजन, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीला गती देण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
public-health-department-state-training-policy-maharashtra-2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी नवीन राज्य प्रशिक्षण धोरण; सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक

August 8, 2026

Leave a Comment