Maharashtra SSC HSC Result 2025 दहावी-बारावीचा निकालाची लेटेस्ट नवीन अपडेट! जाणून घ्या संभाव्य तारीख

Published On: April 26, 2025
Follow Us
Maharashtra SSC HSC Result 2025

Maharashtra SSC HSC Result 2025 सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) निकाल www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

बारावीचे मुल्यांकन पूर्ण, दहावीचे अंतिम टप्प्यात

गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर आणि मुंबई विभागांतील सर्व उत्तरपत्रिका तपासून मंडळाकडे जमा करण्यात आल्या आहेत. तर दहावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सध्या अंतिम टप्प्यात आहे.

यंदा निकाल लवकर लागणार! Maharashtra SSC HSC Result 2025

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा SSC आणि HSC निकाल 2025 लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. HSC परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाली, तर SSC परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू झाली होती. परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील वर्षी बारावीचा निकाल २१ मे रोजी तर दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. मात्र यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही मे महिन्यातच जाहीर होणार आहे.

निकाल कधी लागेल? Maharashtra SSC HSC Result Date 2025

सध्याच्या अपडेट्स नुसार अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही, मात्र सध्याच्या परिस्थिती व मागील वर्षाचे निकाल जाहीर झालेल्या तारखेनुसार यंदाचा HSC, SSC Result 2025 Date निकाल हा खालील तारखेला किंवा त्याच्या आसपास जाहीर होऊ शकतो.

  • बारावीचा निकाल: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर आहे.
  • दहावीचा निकाल: 15 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे.

निकालाच्या तारखा बाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून, ही संभाव्य तारीख आहे.

राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं आहे की, विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी निकाल मे महिन्यातच प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत वेबसाईटवर (mahresult.nic.in) नियमित अपडेट तपासत राहावे.

SSC HSC Result 2025 Check Official Website

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल खालील अधिकृत वेबसाइट्सवर पाहता येईल:

निकाल कसा पाहाल? (Step-by-Step प्रक्रिया)

दहावी किंवा बारावी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीटावरील सीट नंबर आणि आईचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे.

  1. वरीलपैकी कोणतीही अधिकृत वेबसाइट उघडा
  2. Maharashtra SSC/HSC Result 2025’ या लिंकवर क्लिक करा
  3. तुमचा Seat Number आणि आईचे नाव (Mother’s Name) भरावे
  4. Submit’ बटणावर क्लिक करा
  5. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल
  6. निकाल PDF स्वरूपात डाऊनलोड करून ठेवा व प्रिंट काढून घ्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Leave a Comment