शिक्षणाधिकारी व तत्सम गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जाहीर, संपूर्ण यादी Transfer Orders of Education Officers

Published On: May 30, 2025
Follow Us
Transfer Orders of Education Officers

Transfer Orders of Education Officers महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ३० मे २०२५ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार, महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ मधील शिक्षणाधिकारी आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार, ज्या अधिकाऱ्यांनी ३१ मे २०२५ रोजी त्यांच्या सध्याच्या पदावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे, त्यांची बदली करण्यात आली आहे.

नागरी सेवा मंडळाने केलेल्या शिफारशी आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या पूर्व मान्यतेनुसार, खालील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Transfer Orders of Education Officers List

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ मधील शिक्षणाधिकारी आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या बदली झालेल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी (Transfer Orders of Education Officers )

  • श्री. कैलास गणपतराव दातखीळ: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. जालना येथून प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे येथे बदली झाली आहे.
  • डॉ. दिपक अंबादास माळी: सहा. संचा. (प्रशा.), रा. शै. सं. व प्र. प., पुणे येथून सहायक संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. संगिता चंद्रकांत भागवत: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. पालघर येथून शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प. जालना येथे बदली झाली आहे.
  • श्री. देवीदास पंडीत महाजन: शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग, बृहन्मुंबई येथून शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. ठाणे येथे बदली झाली आहे.
  • श्री. तेजराव काळे: सहसचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. परभणी येथे बदली झाली आहे.
  • श्री. अशोक नानासाहेब कडूस: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. अहिल्यानगर येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. जळगांव येथे बदली झाली आहे.
  • श्री. एकनाथ शशिकांत आंबोकर: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. कोल्हापूर येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. कोल्हापूर येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. सुचिता आनंद पाटेकर (रोडगे): शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. अकोला येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. पुणे येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. आशा बालाजी गरूड: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. परभणी येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. रायगड येथे बदली झाली असून, त्यांना १ वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
  • श्री. भास्कर जगन्नाथ पाटील: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. अहिल्यानगर यांची शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. रायगड येथे बदली झाली असून, त्यांना १ वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
  • श्रीम. सविता बिरगे (वाडीयार): शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. नांदेड येथून शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. परभणी येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. मंगल के. धुपे: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. जालना येथून शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प. जळगाव येथे बदली झाली आहे.
  • श्री. जयश्री सुरेशराव राऊत: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. यवतमाळ येथून शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. वर्धा येथे बदली झाली आहे.
  • श्री. नागेश मापारी: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. लातूर येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. धाराशिव येथे बदली झाली आहे.
  • श्री. विकास महादू पाटील: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. जळगाव येथून शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प. बुलढाणा येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. वंदना प्रभाकर फुटाणे: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. लातूर येथून शिक्षणाधिकारी (प्राथ), जि. प. नांदेड येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. शबनम गुलाब मुजावर: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. सातारा येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. सातारा येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. सुवर्णा शिवाजी सावंत: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. रत्नागिरी येथून शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. कोल्हापूर येथे बदली झाली आहे.
  • श्री. दत्तात्रय शिवलिंगआप्पा मठपती: सहा. शिक्षण संचा., विभा. उपसं. कार्या., लातूर येथून शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. लातूर येथे बदली झाली आहे.
  • श्री. नागनाथ मालाजी शिंदे: शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. बीड. यांची शिक्षणाधिकारी, आदिवासी विकास आयुक्तालय प्रादेशिक कार्यालय, अमरावती येथे बदली झाली असून, त्यांना १ वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
  • श्रीम. जयश्री एकनाथराव चव्हाण: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. छत्रपती संभाजीनगर येथून शिक्षणाधिकारी, आदिवासी विकास आयुक्तालय प्रादेशिक कार्यालय, नाशिक येथे बदली झाली आहे.
  • श्री. मोहन संभाजी गायकवाड: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. सांगली येथून शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. नाशिक येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. अरुणा रघुनाथ यादव: शिक्षणाधिकारी, नवी मुंबई मनपा येथून प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. सरोज आधार जगताप: सहा. संचालक (कार्यक्रम), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथून विभागीय सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, कोकण, रत्नागिरी येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. ललिता शहाजी दहितुले (कावडे): शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. ठाणे. यांची प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे.
  • श्रीम. पुनिता गणपती गुरव: शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. रायगड यांची विभागीय सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, कोकण, रत्नागिरी येथे बदली झाली आहे.

या सर्व अधिकाऱ्यांनी त्वरित त्यांच्या नवीन पदाचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बदली रद्द करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आवेदनपत्रे सादर केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट सूचनाही देण्यात आली आहे. आयुक्त (शिक्षण), पुणे यांना या आदेशाप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून बदली झालेले अधिकारी विहित कालावधीत नवीन ठिकाणी रुजू होतील याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले आहेत. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शासन निर्णय येथे डाउनलोड करा.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

zp-teacher-promotion-gr-2026

जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नतीसाठी नवीन कार्यपद्धती जाहीर; TET/CTET पात्रता, निश्चित वेळापत्रकासह शासनाचा मोठा निर्णय

July 31, 2026
saman-kam-saman-vetan-medical-officers-asha-workers-rules-update

वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’चा प्रस्ताव; आशा स्वयंसेविकांच्या नियमावलीतही होणार बदल

July 30, 2026
government-employees-headquarters-leave-rule-circular-july-2026

मुख्यालय सोडण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांनी हे जाणून घ्या; सामान्य प्रशासन विभागाचे नवीन परिपत्रक जारी

July 30, 2026
BLO Duty Allowance GR

बीएलओ कर्मचारी अधिकारी यांचे मानधन मंजूर, शासन निर्णय जारी

July 29, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026

Leave a Comment